दुर्ग रक्षणाचे अविरत श्रम जणू यांच्या पाचवीलाच पुजले  आहे म्हणूनच की काय यांना श्रमिक हे नाव शोभून दिसते. माझे प्रिय मित्र श्रमिक गोजमगुंडे यांचा दुर्ग अभ्यास म्हणजे आजच्या पिढीला मिळालेला एक ऐतिहासिक ठेवा आहे. तंजावर पासून अटक पर्यंत असलेल्या शिवरायांच्या शेकडो किल्ल्यांची पदभ्रमंती केलेला हा माणूस जणू शिवाजी राजांनी आज्ञा देऊन पृथ्वीवर धाडला असावा असेच वाटते. श्रमिक...
आजपर्यंत व्याख्यानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरलोय. गावोगावी जाऊन विचार पेरता पेरता प्रवासादरम्यान कितीतरी लोकेशन्स डोळ्यात कैद होत गेल्या. निसर्गाकडे आणि समाजाकडे पाहण्याची आणि पाहिलेलं मांडण्याची शक्ती माझ्यात का बरं निर्माण झाली असावी असा विचार सतत मनात यायचा पण आज 'इंगित' मुळे मला त्याचे प्रयोजन लक्ष्यात आलंय. खालील फोटोत दिसणारी माझ्या बोटांची फ्रेम इंगितच्या माध्यमातून तुमचे...
कुणी बेड देता का बेड, कोरोनामुळे श्वास घ्यायला अडचण येत असलेल्या रुग्णाला कुणी ऑक्सिजनचा बेड देता का बेड. होय, सद्यस्थितीला हेच सत्य आहे आणि अशी कितीही आर्त हाक मारली तरी बेड मिळेल याची अजिबात शाश्वती नाही. अक्षरशः माणसे घरीच मरायला सोडून द्यावी लागतील एवढी भयंकर परिस्थिती निर्माण होत आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता ही स्थिती वरचेवर अजून...
माझा जन्म अनेक गोष्टी करण्यासाठी झाला आहे. आजवर मी जे जे काही केले त्या सर्व कालाप्रकारांना तुम्ही प्रेम दिलंय. व्याख्याने, बॉलपेन चित्र, पुस्तके, कविता, कॅलिग्राफीज या माध्यमातून मी व्यक्त होत आलोय. हे सगळे करत असताना माझ्याकडून आणखीन एक अपेक्षा तुम्ही सतत ठेवत आलात. तीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आज मी इंगित प्राॅडक्शन हाऊसची निर्मिती केली आहे. या बॅनरची...
दिनांक २० ऑगस्ट रोजी माझे आजोबा तुकाराम गरड उर्फ बापू यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. बापूचे असे आमच्यातून निघून जाणे प्रचंड वेदनादायी होते. नातवाचा पहिला दोस्त आजोबा असतो. लहानपणी आमच्या लाडशेतातून घरी येताना बापू मला खांद्यावर बसवायचे. मी त्यांच्या डोक्याला घट्ट पकडून खांद्यावर दोन्ही पाय सोडून ऐटीत बसायचो. माझे ओझे खांद्यावर घेतलेल्या बापूंच्या...
बारक्यापणीचा ह्यो सगळ्यात आवडीचा डोंगरी मेवा. शाळेत जाताना मधल्या सुट्टीत धामनं खायची म्हणून कायबी करून आईच्या डब्यातून सुट्टे दोन रुपये घेऊन जायचो. मधल्या सुट्टीचा टोल पडला रे पडला म्हणलं की लिंबाच्या झाडांकडं चिंगाट पळत सुटायचो, तिथे घोळवेवाडी किंवा ढेंबरेवाडीच्या एखाद्या मावशी न्हायतर तर मामा एका पितळी पाटीत धामनं घिऊन बसल्यालं असायचं. वर्गात श्रीमंतांची पोरं जवा पाच रुपयाचं...
जानेवारी २००९ साली फॉर्म भरला होता. त्याचे हे ब्राउचर मी जपून ठेवले होते आज अचानक ते या स्वरूपात दिसले. कधीकाळी पाहिलेले स्वप्न आज या अवस्थेत दिसल्यावर वाईट वगैरे अजिबात नाही वाटले, खंत तर नाहीच नाही. कारण हे माझे सर्वस्व नाही जगात खूप साऱ्या गोष्टी आहेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी. हुकून चुकून जर या स्वप्नात यशस्वी झालो असतो तर...
मुंबईच्या गटारातून पाणी कमी कचरा आणि प्लॅस्टिक जास्त वाहत आहे. त्यातला कचरा काढणारे किती आणि त्यात कचरा टाकणारे किती आहेत याचा विचार केला की उत्तर मिळते. मुंबईत माती शोधून सापडत नाही मग या गटारी गुटख्याच्या पुड्या, पाण्याच्या बाटल्या, कॅरीबॅग आणि इतर तत्सम टाकाऊ पदार्थांनीच तुंबतात. ही घाण करणारे आपणच आहोत आणि अशी परिस्थिती झाल्यावर शिव्या घालणारेही आपणच...
मागच्या महिन्यात अमेरिकेतील शार्लट मराठी मंडळासाठी मी ऑनलाईन व्याख्यान दिले होते. आज त्यांनी त्या व्याख्यानाचे स्वेच्छा मानधन पाठवले. हे माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा डॉलर मध्ये मिळालेलं बक्षीस आहे. लहानपणी अमेरिकेची नोट जरी कुणाकडे असली तरी ती बघायची प्रचंड उत्सुकता असायची. मी शाळेत असताना आमच्या एका नातेवाईकांकडून मिळालेली ती नोट मी कुतूहल म्हणून पाकिटाच्या आत जपून ठेवली होती. ती...
शहरातील एका झोपडीवजा घरात राहणारा एक माणूस, घरात खाणारी सात तोंडं त्याच्या स्वतःसह बायको, म्हातारे आई वडील आणि दोन मुली व एक मुलगा. घरात कामावणारा हा एकटाच माणूस. रोज सकाळी एखाद्या भाकरीत मोकळी भाजी बांधून रोजगाराच्या शोधात चौकात उभा राहायचे. मिळेल त्या कामावर रोजंदारी करून दिवसाकाठी ३०० रुपये कमवायचे. मागच्या लॉकडाऊनमध्ये घरात होते ते सगळे संपले. आई...