LATEST ARTICLES

आज आमच्या संसाराला चार वर्षे पूर्ण झाली. लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला मी काहितरी लिहीत आलोय. त्या त्या काळात आलेले समकालीन अनुभव लिखाणात उतरवत आलोय. पहिल्या वर्षी बाल्यावस्थेत असणारा माझा आणि विराचा संसार आता साऊ जन्माला आल्यापासून तारुण्याकडे वाटचाल करत आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्या संसाररूपी झाडाला लागलेल्या कादंबरी नावाच्या फळाने आम्हाला तृप्त केलंय. तिच्यासोबतचा व्यतीत होणारा प्रत्येक क्षण म्हणजे...
ही आहे आमची शारदामाऊ चव्हाण, पत्र्याच्या घरातून आज टुमदार बंगल्यात प्रवेश करत आहे. आयुष्यभर मोलमजुरी करून शारदा माऊ आणि दिऊ बापूंनी संसाराचा गाडा हाकत हाकत पोरांना वाढवलं. मी लहान असल्यापासून शारदा माऊला आमच्या शेतात काम करताना पाहत आलोय. मोठा मुलगा अक्षय अवघ्या वर्षभराचा असताना सुद्धा त्याला झाडाखाली झोपवून ती कामावर यायची, मी अक्षयला खेळवत बसायचो. आज अक्षय...
आमची लेक कादंबरी (साऊ) या जगातले सर्वात शक्तिशाली शस्त्र चालवायला शिकल्याचा आनंदोत्सव साजरा करतोय. वर वर साधी वाटणारी ही गोष्ट वाटते तेवढी साधी मुळीच नाही. हाताचा पंजा ते वहीचे पान व्हाया घराच्या भिंती आणि गादीचे बेडशीट असा तिचा लिहिण्याचा प्रवास झालाय. जेवणाची नाटकं, मोबाईलचे फॅड, खेळण्याचे वेड यातून ही दोन वर्षाचं लेकरू असं रोज अर्धा तास वहिवर...
बोलताना भाषेचा बाज किती महत्वाचा आसतोय हे शहाजीबापूंच्या ऑडिओ रेकॉर्डिंग वरून समजलं आसलंच. मुळात झाडी, डोंगर, हॉटेल हे शब्द काय कुणाला नवं न्हाईत पण ते ज्या टोन मध्ये बोलले गेले त्येज्यामुळं त्ये व्हायरल झाल्यात. लोकासनी काय वाटल म्हणून आईनं शिकीवलेल्या आपल्या गावाकडच्या मातृभाषेची आज्याबत लाज न बाळगता बोलणारी माणसं आपल्याला आवडत्यात. म्या सुदा आजपस्तोर हजारो व्याख्यानं दिली,...
इन्स्टा स्क्रोल करता करता गजरा केसांवर माळलेला एखादा फोटो दिसावा. तो चितारण्याचा मोह पडावा आणि कोऱ्या कागदावर बॉल पेनच्या हजारो रेषा ओढून अशी कलाकृती निर्माण व्हावी. While scrolling Insta, I could see a photo of Gajra on her hair. I could be tempted to draw and draw thousands of lines of ball pen on...
Name : MeerabaiArtist : Vishal Garad ©Material : Ball Pen on paperTime required : 5 hrs
आता पहिल्यासारखं फारसं लिहू वाटत नाय, आन् फक्त टि.आर.पी साठी लिहिणं माझ्या बुद्धीला पटत नाय तरीबी सध्याचं वातावरणंच झालंय इतकं गढूळ की निवळी फिरीवल्याशिवायबी दम निघत नाय म्हणून हा काव्यप्रपंच. नेते मंडळींच्या उधो उधोतून मिळालाच थोडा येळ तर हेबी नक्की वाचा दोस्तहो, शेवटी बाप आणि मातीच जास्त महत्वाची ओ.
आज सरडे गुरुजींचा त्र्यांनव्वा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. सरडे गुरुजींनीच मला बाराखडी शिकवली आहे. इयत्ता बालवाडी आणि पहिली दुसरीला ते मला शिकवायला होते. त्यांचे संस्कृत भाषेचे ज्ञान अगाध आहे. सहज जरी गप्पा मारत बसलो तरी आजची पिढी संस्कृत साहित्यापासून वंचित राहिल्याची ते खंत व्यक्त करतात. वयाची ब्यान्नव वर्ष पूर्ण होऊनही...
नुकताच एस.एस.राजामौली यांचा RRR हा चित्रपट पाहिला. त्यांच्या या चित्रपटावर जसा रामायणाचा प्रभाव आहे तसाच मला त्यातील काही प्रसंगावर शिवचरित्राचा प्रभाव दिसला. मी जेव्हा त्यांचा बाहुबली पाहिला होता तेव्हाही त्या चित्रपटात शिवचरित्रातल्या प्रसंगांच्या साम्याबद्दल सविस्तर लिहिले होते. याही वेळी RRR पाहिल्यानंतर काही नोंदी तुमच्यासमोर मांडतोय. ज्यांनी चित्रपट पाहिलाय त्यांच्या लगेच लक्षात येईल ज्यांनी नाही पाहिला त्यांच्या पाहिल्यावर...
आज साऊचा दुसरा वाढदिवस. मातृभाषेचे सॉफ्टवेअर तिच्या मेंदूत व्यवस्थित इन्स्टॉल झाल्यामुळे गप्पा मारायला घरात अजून एक हक्काचं माणूस तयार झालंय. पहिल्या वाढदिवसाला तिच्या रांगण्याचे, बसण्याचे आणि भिंतीला धरून चालण्याचे सुद्धा कौतुक वाटायचे आणि आज तिच्या दुसऱ्या वाढदिसाला तिच्या हसण्याचे, पळण्याचे, उडया मारण्याचे, बोलण्याचे कौतुक वाटतंय. आपल्याच रक्तातून तयार झालेल्या रक्तात जेव्हा आपले गुण दिसायला लागतात तेव्हा निसर्गाने...