आज दिनांक १८ एप्रिल २०१८ रोजी उस्मानाबादच्या विमानतळाजवळील स्वआधार प्रकल्पातल्या अनाथ मुलींच्या शुभहस्ते माझ्या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले. ज्याला जो आनंद मिळत नाही त्याला तो देण्यातच खरा आनंद आहे म्हणुनच मी या संकेतस्थळाचे उद्घाटन या मुलींच्या हस्ते करण्याचे ठरवले होते. लॅपटाॅपवर एन्टरचे बटन दाबताना त्या मुलींना झालेला आनंद शब्दात नाही सांगता येणार परंतु त्यांच्या आयुष्यात संस्मरणीय ठरावा असा एक क्षण त्यांना देऊ शकल्याचे समाधान मला मात्र आयुष्यभर राहील हे नक्की. यावेळी माझ्यासमवेत वेबसाईट मेकर रोहीत शिंदे, युवा व्याख्याते समाधान शिंदे, प्रकल्प अधिक्षक गुरूनाथ थोडसरे आणि हनुमंत हिप्परकर उपस्थित होते.

माझ्या भाषणाच्या चित्रफीती, बाॅलपेन ने साकारलेली चित्रे, कुंचल्यातुन निर्माण झालेलं सुलेखन, विविध विषयावरील वास्तव लिखान हे आणि बरंच काही आज या वेबसाईटच्या रूपाने अजरामर झालंय. मी असेल नसेल परंतु गुगलवर फक्त विशाल गरड टाइपुन तुम्ही हे सारं विश्व अनुभवू शकता. तुमचं भेटनं मला नेहमीच बळ देत आलंय यापुढेही तुमचं नेहमीचं भेटनं सुरूच राहुद्या. या विशाल गरड डाॅट काॅम वर तुम्हाला काहीतरी चांगलं पहायला, ऐकायला, आणि बघायला मिळावं म्हणुन मी सदैव प्रयत्नशील राहील.

चला तर मग तुमची आणि माझी या संकेतस्थळावरची पहिली भेट आत्ताच घडवूयात. खाली दिलेल्या लिंकला लगेच क्लिक करा आणि कला व साहित्याच्या विशाल विश्वात प्रवेश करा. फिरून झाल्यावर याच संकेतस्थळाच्या काॅन्टॅक्ट अस या मेनू मध्ये जाऊन तुमची प्रतिक्रिया नक्की नोंदवा.
धन्यवाद !

इथे क्लिक करा 👉 www.vishalgarad.com