तीला जन्मू द्या, खेळु द्या, पळू द्या तीचा हाच वेग एक दिवस देशाचा स्पीड वाढवेल. गावकुसात गरिबीच्या विळख्यात जगणाऱ्या रणरागिणींनाही जग जिंकण्याची जिद्द बहाल करेल. तीचं फक्त नाक आणि कान टोचत बसण्यापेक्षा ती पळताना तीच्या पायाला टोचणारे खडे तीच्या झोपलेल्या स्वप्नांना जागे करतील. त्या रक्ताळलेल्या गोळ्याला पोटातुन बाहेर काढण्यापुर्वी विचार करा ती उद्याची हिमा, सिंधू, सायना, मेरी तर नसेल ? ती फक्त शिकुन नोकरी मिळवण्यासाठी किंवा घरातल्या भाकऱ्या थापण्यासाठी नसून ती देशाची मान उंचावण्यासाठीही सिद्ध आहे. जग जिंकल्यानंतर राष्ट्रगीत ऐकताना तीच्या डोळ्यातुन ओघळलेल्या दोन अश्रूंची किंमत आज हिंद महासागरापेक्षा जास्त आहे. तीच्या देशभक्तीचा हा ओला पुरावा आजन्म स्मरणात राहील

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १४ जुलै २०१८