मंत्रालयापाहुन ग्रामपंचायतींपर्यंत, अमेरीकेपासुन पांगरीपर्यंत, मंत्र्यांपासुन सरपंचांपर्यंत, कलेक्टरपासुन ग्रामसेवकांपर्यंत, कार्यकर्त्यांपासुन आमदारांपर्यंत, दिग्दर्शकापासुन स्पाॅटबाॅयपर्यंत आणि मित्रांपासुन हितशत्रूंपर्यंत, एकुणच काय तर गल्लीपासुन दिल्लीपर्यंतच्या या सर्वांच्या शुभेच्छांनी समृद्ध झालो. ३६४ दिवसाच्या कामाची पावतीच जणू वाढदिवसादिवशी मिळत असते. मी दिवसागणिस शेकडो लोकं माझ्यासोबत जोडत आहे त्यामुळे प्रत्येक वर्षी शुभेच्छांचा आकडा सुद्धा त्याच पटीत वाढतो आहे. मैत्रजणांच्या निस्वार्थी शुभेच्छांच्या पावसात भिजून भिजून चिंबाट झालोय.

पहिले फक्त घरचे शुभेच्छा द्यायचे मग याच शुभेच्छा शेकड्यात यायल्या नंतर हजारोत यायल्याय आता मात्र या लाखात येत आहेत. सोशल मिडियावर हजारो शुभेच्छा पेंडींग आहेत. दोस्तांनो वेळेअभावी सर्वांना वैयक्तिक धन्यवाद देऊ शकत नाही तरीही शक्य तेवढ्यांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केलाय मी. तुमचं प्रेम ह्रदयाच्या एका कप्प्यात फिक्स डिपाॅझिट करून ठेवलंय व्याजासकट परतफेड होईलंच कधीतरी.

फेसबुक टाईमलाईनवर जी जी पोस्ट दिसली त्या प्रत्येकाच्या खाली धन्यवादची कमेंट दिली आहे. फेसबुकच्या भिताडावरचा गिलावा गळून पडावा एवढ्या पोस्ट त्यावर टांगल्या गेल्या आहेत. व्हाट्स अॅप तर हँग होऊन बसलं होतं काल, आज कुठं थोडं शुद्धीवर आलंय. अर्थात हे प्रेम खूप मोठे आहे. दोस्तांनो तुम्ही फेसबुकवर व्हाॅट्सअॅपवर शुभेच्छा दिल्या परंतू ईथुन पुढे जिथे कुठे मी दिसेल, भेटेल तिथे नक्की या; मला तुम्हाला अलिंगन देऊन धन्यवाद म्हणायचंय. तुम्ही माझ्यामागे उभी केलेली ही ताकद माझ्याकडून ईतिहास घडवणार आहे. यातुनही शुभेच्छांच्या प्रचंड ट्रॅफिकमुळे एखादी पोस्ट मला दिसली नसेल व त्यावर कमेंट द्यायची राहुन गेली असेल त्या सर्वांस देखील मनापासुन धन्यवाद. आज पहाटेपासुन सुरू झालेले धन्यवादचे सदर हाताचे बोटे दुखोस्तोवर चालू राहीले. मित्रांनो तुम्ही जर मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असतील तर त्या पोस्टच्या कमेंट बाॅक्समध्ये जाऊन बघा माझा धन्यवाद दिसेल.

बाकी तुमचे आभार मानण्यासाठी ‘आभारी आहे’ ची मस्त कॅलिग्राफी आत्ताच ताज्या भट्टीतुन बाहेर काढली आहे. आपापल्या वाढदिवसाचे आभार मानण्यासाठी ही कॅलिग्राफी फोटो बदलून बिनधास्त वापरा भावांनो फक्त ती कोपऱ्यातला काॅपीराइट तेवढा तसाच ठिवा. कारण कला निर्माण करणारा कलाकार पुसुन जाऊ नये म्हणून. आजवर तुमच्या प्रोत्साहनपर शुभेच्छांमुळेच माझ्यातला कलाकार जित्ता राहीलाय. ये तो सिर्फ ट्रेलर है पिच्चर तो अभि बाकी है मेरे दोस्त.

वक्ता | कवी | लेखक | चित्रकार | सुलेखनकार
तुमचाच मित्र : विशाल विजय गरड