लय दिसरात एक करूनशान लेकरं आभ्यास करत्याती. पोटाला चिमटं काढुन खिशाला कात्री लावून पै पै साठवून शिक्षणासाठी पैका गोळा करत्याती. मराठ्याची समदीच लेकरं लखपती आणि ईस्टेटवाली न्हाईती वं.

ते आरक्षण कसं मिळत आस्तय, कोण देत आस्तय एवढा मोठा आभ्यास न्हाय बा आमचा पण न मागता मिळत नसतंय यवढंच ठांव हाय; म्हणुन ईनंती हाय मायबाप कोर्टाला, आयोगाला आन् सरकारला, आवं द्या की आमालाबी आरक्षण .

शेता पोतात राबणाऱ्या गरिब मराठ्यांच्या गौऱ्या मसनात गेल्या, आता कुठं पोरा पोरीला शिकवून नौकरीचं सपान बघायल्याती पण आता त्यांच्याबी लेकरांसाठी एक घास राखून ठिवा बा. आवं द्या की आमालाबी आरक्षण.

गुणवत्ता आसुनबी लेकरं बिगारी व्हायली, डायवर व्हायली, गाडा टाकून चहा आन् बटाटं वडं ईकायली. ह्यंच्या बी जिंदगीत यिऊ द्या की शिक्षण; आंव द्या की आमालाबी आरक्षण.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २० जुलै २०१८