दिनांक ०९ मार्च २०१८ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून वैरागमधील जिजाऊ ग्रुपने आयोजित केलेल्या माझ्या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन सोलापूर मध्ये गरिब भटक्या बालकांसाठी वंचितांची शाळा चालवणारे व गावाकडची जमीन विकून या बालकांसाठी आता निवासी शाळा काढण्याचे स्वप्न पाहणारे युवा समाजसेवक प्रसाद मोहिते आणि अनूताई मोहिते उपस्थित होत्या. आजच्या व्याख्यानात मला मानधनाच्या स्वरूपात मिळालेल्या रक्कमेतला काही वाटा मी त्यांच्या प्रार्थना फाऊंडेशनला सुपुर्द केला. “एक घास समाजसेवेला” या माझ्या उपक्रमाअंतर्गत इथून पुढेही अशा समाजसेवकांना (शब्द + अर्थ) शब्दार्थी मदतीचा हात देण्यासाठी मी कटीबद्ध.

| प्रा.विशाल गरड