ड्रायव्हिंग करताना ओव्हरटेक हा कम्पल्सरी पार्ट आहे. आज ड्रायव्हिंग करताना समोर एक आयशर टेंम्पो चालत होता. खुप वेळ झाले ओव्हरटेक नाही करता आले. थोडे पुढे जाण्याचा प्रयत्न केला की लगेच समोरून एखादे वाहण यायचे पुन्हा गाडी लेफ्ट साईडला दाबावी लागायची. माझ्या गाडीची स्पीड पाॅवर समोरच्या आयशरपेक्षा जास्त असतानाही समोरून येणाऱ्या गाड्यांमुळे त्या गाडीला मागे टाकून पुढे निघून जाणे शक्य नव्हते. ओव्हरटेकची योग्य वेळ येईपर्यंत आयशरच्याच स्पिडने मला चालने गरजेचे होते. शेवटी बऱ्याच वेळानंतर संधी पाहुण मी माझी फोर्ड ओव्हरटेक केली आणि काही क्षणात आयशरला मागे टाकून पुढे निघून गेलो.

गाडी चालवता चालवताच एक विचार मनात आला. की कधी कधी आपल्या आयुष्यातही आयशरसारखी संकटे पुढे येतात. त्यांना मागे टाकून पुढे जाण्याची आपली क्षमता असतानाही समोरून येणारा धोका लक्षात घेता. संकटांसोबतच काही काळ चालावे लागते तेव्हा थोडीशी वाट पाहूण संधी मिळताच त्या संकटांना मागे टाकून सरकन पुढे जायचे; ईच्छित स्थळी वेळेत आणि सुखरूप पोहचण्यासाठी.

गाडी चालवताना होणाऱ्या अपघातांपैकी बहुतांशी अपघात हे ओव्हरटेक करतानाच होतात. यावर ‘संयम’ हेच प्रभावी औषध आहे. पुस्तक वाचताना, जेवण करताना आणि गाडी चालवताना एकाग्रता कायम ठेवली की बुद्धी, शरिर आणि आयुष्य दिर्घकाळ टिकतं. तेव्हा संकटांना संयमाने ओव्हरटेक करायला शिका आपल्या आयुष्याची व्हॅलिडीटी नक्कीच वाढेल.

टिप : सोबतचा फोटो मी गाडी चालवताना काढलेला नसुन माझ्या मागच्या सीटवर बसलेली माझी बहिण रूचा हिने टिपला आहे.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ११ मे २०१८