बायको भाकऱ्या करित होती आणि आई धुनं धूत होती. मी पाणी तापवायच्या चुलीजवळील आडूला खेटून कॅलिग्राफी बनवत होते. कॅलिग्राफी पेनचे शेकडो फटकारे कोऱ्या कॅनव्हासवर मारून तब्बल दिड तासाच्या सलग प्रयत्नांतून साकारली माझ्या ‘मुलुखगिरी’ या आगामी पुस्तकाच्या नावाची ही एकमेवाद्वितीय कॅलिग्राफी. स्वतः आर्टीस्ट असणं मला नेहमीच फायद्याचं ठरते. विशाल नावाच्या देहात प्रयत्नांची पराकाष्टा करून अनेक कलाप्रकारांना अढळ स्थान देऊ शकल्यानेच जिथे जे हवे त्यासाठीचा तो कलाकार माझ्यात जिवंत होतो आणि मग साकारते मुलुखगिरीसारखी कलाकृती. फिलिंग अलवेज प्राऊड टू बी अॅन आर्टीस्ट.

कोणत्याही पुस्तकाच्या किंवा चित्रपटाच्या नावाचा फाॅन्ट आपल्या निरंतर लक्षात राहण्यासाठी तो तितकाच दर्जेदार असायला हवा असा प्रत्येकाचा अट्टाहास असतो. मी तर जातीवंत कलाकार माणूस तेव्हा माझ्या आगामी मुलुखगिरी या पुस्तकाची कॅलिग्राफी सुद्धा तितकीच युनिक आणि आकर्षक व्हावी असाच प्रयत्न होता. संपुर्ण मार्च महिना सतत हेच खदखदत होतं डोक्यात. ‘मुलुखगिरी’ हे नांव काही दिवसांनी सर्वांच्या प्रचंड ओळखीचे होईल त्यासोबतच मुलुखगिरीची ही कॅलिग्राफी सुद्धा सदैव स्मरणात राहील.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २४ मार्च २०१९