आजचा माझा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करून पांगरीला यायला दुपार झाली. सकाळपासुन उपाशीच असल्याने खुप भुक्याजलो होते. शेतात आल्यावर चिंचेच्या गार सावलीखाली पटकरात गुंडाळलेली भाकरी, मोकळी भाजी आणि कांदा असे पोटभरून जेवलो. वाढदिवसादिवशी यापेक्षा भारी डिश आणखीन काय असावी. यावर्षीपासुन दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त शेतात एक झाड लावण्याचा संकल्प केलाय. त्यानुसार भर उन्हात कुदळ आणि खोऱ्या घेऊन खड्डा खांदला आणि त्यात एक पिंपळाचे सुंदर झाड लावले. विचार पेरणीसारखाच हा वृक्ष पेरणीचा अनुभव तितचाच आनंददायी वाटला. वाढदिवसादिवशी फक्त एक झाड लावणे हि काही फार मोठी गोष्ट वाटत नसली तरी हाच विचार जर प्रत्येक व्यक्तीने केला तर महाराष्ट्रात फक्त एकाच वर्षात दहा कोटी झाडे लावून निघतील. तुम भी करके देखो अच्छा लगता है |

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड