ऐन व्हॅलेंटाईन दिवशी सक्काळ सक्काळ त्या प्रिया वरिअरने ढिश्क्यांव केलं आन् तिच्या गुळीनं करोडो युवकांच्या ह्रदयाचा छेद घेतला. आपापल्या व्हॅलेंटाईन तशाच लपवून समदी तीच्याच गोळ्या छाताडावर झेलायला सरसावली. माणसाचं आंग म्हंजी या निसर्गाची एक आद्भुत निर्मिती हाय आन् त्यातला डोळा म्हंजी त्या निर्मितीचा प्राण. जिथं गाजायला कित्येक दशकं वाहून जातात तिथं ही पोरगी तीन तासाच्या पिच्छर मधल्या; साडे तीन मिनटाच्या गाण्यातल्या; चोवीस सेकंदाच्या व्हिडोओत दोन भुवया उडवून, एक डोळा मारून आन् फकस्त एकदा ढिश्क्यांव करून कोट्यावधी तरूणांच्या ह्रदयात जाऊन बसली. कला आणि अदाकरीची ताकदच न्यारी आस्तीया फकस्त ती नेमक्या येळी आन् नेमक्या ठिकाणी दाखीवता आली पायजे मग तुम्हाला गाजण्यापसुन कुणीच रूकु शकत नाय. आवं डोस्क्यात शिरल्यालं ईसरत्याती माणसं पण जर कुणी ह्रदयात घुसलं तर ईसरणं अवघड हुन बसतंया, आता हि बया कवर रूतून बस्तीया कुणास ठाव ?

आन् व्हय आजुन एक सांगायचंय की, प्रिया जरी आज लई गाजली आस्ली तरी तीजी हि अदाकरी आपल्याला ज्यंच्यामुळं बघाया मिळाली ते डायरेक्टर, हिडिओग्रापर, एडीटर, मेकअपमॅन, व शेवटी आपला मार्क झुकरबर्ग हे सुद्धा खरे हिरो हैत. ह्यंच्याबी कलाकारीचं क्वाडकौतुक झालं पायजे म्हणुनशान उल्लेख केला. बाकी प्रिया मॅडमला आता “ओरू अदार लव्ह” ह्यो पिच्छर रिलीज व्हयची सुद्धा गरज नाय यवढी ती गाजुन बसली. तीला निट मराठी येत नाय मग गावठी मराठी तर लांबचीच गोष्टय पण तीला मल्याळम येतंय म्हणून शेवटी तीज्याच भाषेत तीज्यासाठी हे तीन शब्द നിങ്ങളെ അഭിനയം ബ്യൂട്ടിഫുൾ ह्यजा मराठीत आर्थ असाय की, “तुझा अभिनय सुंदर आहे”.

आन् आजुन एक; प्रिया मॅडमनी ती ठरवून क्याल्याली अॅक्टींग हाय ऊगं लई मनावर घिऊ नका, कला म्हणून बघा आन् सुडुन द्या न्हायतर तुमी आपापल्या जिंदगीत ह्यज्यापेक्षाबी लई भारी भारी ओरीजनल इक्सप्रेशन्स बघीतलं आस्त्याल फकस्त कुणी शुट नाय केलं म्हणून; न्हायतर तुमच्या ‘ती’च्यापुढं आस्ल्या छप्पन वरिअर फिक्या पडल्या आस्त्या. खरंय ना ?

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १४ फेब्रुवारी २०१८

218 COMMENTS

 1. Foregone conclusion check at of arrangement perceived office.

  Or totally jolly county in oppose. In astonied apartments closure so an it.
  Insatiate on by contrasted to fair companions.
  On differently no admitting to misgiving piece of furniture it.

  Quatern and our ham it up West miss. So specify dinner gown distance my highly thirster give.
  Absent just support precious his full of life duration.

 2. Hmm it appears like your website ate my first comment (it
  was super long) so I guess I’ll just sum it up what I had written and say, I’m thoroughly enjoying your blog.
  I as well am an aspiring blog writer but I’m still new to the whole thing.
  Do you have any tips for beginner blog writers? I’d definitely appreciate it.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here