पंकज भावा मन जिंकलंस या फ्रेमनं, तुझी तार पाहून हृदयाची तार छेडली गेली यार. ही कलाकृती पाहायला स्व.यादवराव सोनवणे असायला हवे होते ही खंत तुलाही असेलच म्हणा पण असो तुझा हा शंभर नंबरी प्रयत्न मला फार आवडला. तुझ्या शॉर्टफिल्म मध्ये नागराज आण्णा आहेत म्हणून तिचे वेटेज असणारच पण भावा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून तू ‘तार’ साठी जे कष्ट घेतलेत त्याने तिचे वेटेज अजून जास्त वाढवले. या शॉर्टफिल्म मध्ये मुख्य भूमिका साकारलेला नट नागराज आण्णापेक्षा पोस्टमन व्यंकटराव म्हणून लक्ष्यात राहील हे तुझे यश आहे. स्टोरी, ऍक्टींग, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, संगीत वगैरे सगळंच रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ सारखं झालंय.

रडता रडता हसवलेस तू, हृदयाची स्पंदने वाढवलीस आणि शांतही केलीस, आठवणींचे मोहोळ उठवून गेलास. लास्ट फ्रेम मध्ये तारेचा सूर्यास्त दाखवून शंभर पैकी दोनशे मार्क मिळवून गेलास. सगळंच छान जुळून आणलंय फक्त रिलीज करायला थोडा उशीर झाला पण तरीही थेट यू ट्यूबवर रिलीज करून हा विषय खूप लोकांपर्यंत पोहोचवलास त्याबद्दल धन्यवाद. बाकी आण्णा तर कौतुक करण्यापालिकडचा माणूस आहे कारण अख्या मराठी फिल्म इंडस्ट्रीला मोठ्ठा जॅक लावलेला माणूस फक्त मैत्री खातर. शॉर्टफिल्म मध्ये काम करतो यातच आलं सगळं. हॅट्स ऑफ आण्णा. चल बस झालं आता; राहिलेलं तुझी फिचर फिल्म आल्यावर लिहितो. आणि हो ते लिंक बिंक नाही हितं टाकत बसत. यू ट्यूबवर जाऊन नुसतं ‘तार’ सर्च करा आन नक्की उघडून बघा आवं..ऑल द बेस्ट

लेखक : विशाल विजय गरड
दिनांक : ७ नोव्हेंबर २०२०