भारतीय पोस्ट ऑफीसच्या वतीने सुरू केलेल्या माय स्टॅम्प उपक्रमा अंतर्गत आज माझे छायाचित्र असलेले पोस्ट तिकीट बार्शी तालुका पोस्ट ऑफीसचे उपविभागीय डाक निरिक्षक अमित देशमुख, पोस्ट मास्टर लतिफ शेख, उदय पोतदार, डाक आवेक्षक अजित नरगिरे, अमोल भताने यांनी मला सुपुर्द केले. यासाठी आमच्या बार्शीचे पोस्ट तिकीटांचा संग्रह जोपासलेले उदय पोतदार यांनी विशेष प्रयत्न केले. गेल्या महिण्यातच उदय सरांनी “सर मी तुमचे पोस्ट तिकिट काढूण तुम्हाला भेट देणार असल्याची ईच्छा व्यक्त केलेली”. त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज वेळात वेळ काढूण माझ्यासाठी ही अनमोल आणि अविस्मरणीय भेट दिली त्याबद्दल उदय सरांचा मी आभारी आहे. उदय पोतदार यांनी जगातल्या प्रत्येक देशाची टपाल, तिकीटे आणि नाणी जोपासण्याचा छंद जोपासला आहे. आजवर त्यांनी शेकडो वर्षापुर्वीपासुनच्या तिकीटांचा, नाण्यांचा मोठा संग्रह केला आहे. सरांच्या संग्रहात आता माझे देखील तिकिट असेल यापेक्षा मोठा सन्मान आणखीन काय असावा. Thanks to Indian Post