शिवरायांच्या काळात युद्ध जिंकण्यासाठी एकाही मावळ्याने आत्महत्या केली नाही. रणांगणावर लढता लढताच प्राणांची बाजी लावली. स्वतःचा जिव देऊन प्रश्न सुटत नाही उलट जगुन लढण्याची जिद्द कमावता येते.

आरक्षण हे माणसांनी तयार केलंय ते बंद करायचे वा चालू ठेवायचे. कुणास द्यायचे वा कुणास नाही. हे सगळं माणसांच्याच हातात असतं तेव्हा देव आणि निसर्गाच्या हातात असणाऱ्या जन्म आणि मृत्युचा फैसला तुम्ही करू नका.

आपल्या घराचे जेवढं नुकसान आरक्षण नसल्याने होत आहे त्याहुन कैकपटीचे मोठे नुकसान तुमचा जीव गेल्याने होईल. तेव्हा मिळणाऱ्या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आधी आपण हयात असणं महत्वाचं आहे.

जलसमाधी, आत्मदहन, फाशी असली आंदोलने मराठा समाजाला न परवडणारी आहेत. बांधहो तुमच्या जिवावरून अशी पन्नास आरक्षण ओवाळून फेकू फक्त तुम्ही जीव देऊ नका.

आझादी बलिदान माँगती है, ही म्हण स्वातंत्र्यपुर्व काळात लागू पडत होती परंतू आता स्वतंत्र भारतात आरक्षणासाठी बलिदान द्यावे लागने हे दुर्देव आहे. स्व.काकासाहेब शिंदे यांस भावपुर्ण श्रद्धांजली !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २३ जुलै २०१८