राष्ट्रगीत सुरू झाल्यावर हिमा दासच्या डोळ्यातील ओघळलेल्या अश्रूंनी मनात घर केलं होतं. कधी एकदा ते कागदावर उतरवतो असं झालतं. आज हातात काळा आणि तांबडा बाॅलपेन घेतला व कोऱ्या कागदावर फिरवत बसलो. हातात बाॅल पेन, पेनच्या निपवर रोखुन धरलेले डोळे, पॅडवर निपचीत पडलेला कागद आणि हातातल्या बोटांना आदेश देणारा मेंदु यांच्या तीन तासाच्या अविरत युद्धानंतर हे चित्र साकार झाले. हे चित्र हुबेहुब यायला हवे असा प्रयत्न नव्हता पण त्या डोळ्यातला भाव आणि गालावर ओघळलेले अश्रू मात्र हुबेहुब काढण्याचा माझा अट्टाहास होता.

लेखक तथा चित्रकार : विशाल गरड