आजपर्यंत व्याख्यानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरलोय. गावोगावी जाऊन विचार पेरता पेरता प्रवासादरम्यान कितीतरी लोकेशन्स डोळ्यात कैद होत गेल्या. निसर्गाकडे आणि समाजाकडे पाहण्याची आणि पाहिलेलं मांडण्याची शक्ती माझ्यात का बरं निर्माण झाली असावी असा विचार सतत मनात यायचा पण आज ‘इंगित’ मुळे मला त्याचे प्रयोजन लक्ष्यात आलंय. खालील फोटोत दिसणारी माझ्या बोटांची फ्रेम इंगितच्या माध्यमातून तुमचे डोळे सुखावण्यासाठी आणि मेंदूला विचार करायला भाग पाडण्यासाठी सज्ज असेल. बस्स हसणाऱ्यांनी हसून घ्या आणि साथ देणाऱ्यांनी साथ द्या वेळ नाही सांगत पण तुम्हा सर्वांनाच अभिमान वाटेल अशी कलाकृती एक दिवस नक्की निर्माण करेन, तोपर्यंत छोटे मोठे प्रयत्न तुमच्यासमोर मांडत राहीलच. दाद देत राहा दोस्तांनो..

विशाल विजय गरड
निर्माता : इंगित प्रॉडक्शन