वाढदिवसानिमित्त मला तुम्ही दिलेल्या प्रत्येक शुभेच्छांना रिप्लाय करणे म्हणजे अंगावर आलेल्या शुभेच्छांच्या त्सुनामीला चमच्याने परत समुद्राकडे टाकण्यासारखे होईल. खरंच तुमच्या प्रेमाची उतराई या जन्मात होऊ शकणार नाही. दिवस रात्र जरी मोबाईल वर बसलो तरी प्रत्येक पोस्टला व पोस्टवर केलेल्या कंमेंटला रिप्लाय देणे मला अशक्य आहे. आपणच एक माणूस म्हणून माझ्या मर्यादा लक्ष्यात घ्याव्यात. आज वाढदिनी मला शुभेच्छा दिलेल्या प्रत्येकाचे या पोस्टच्या माध्यमातून मी आभार मानतो. तुमच्या प्रेमाने एका दिवसात मिळालेली ताकद पुढे वर्षभर माझं पेट्रोल म्हणून काम करते. कोकण ते विदर्भ आणि मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र  अश्या चोहोबाजूंनी जणू माझ्यावर शुभेच्छांचा अभिषेक झालाय. कळत नकळत माझ्या प्रबोधनातून, लिखाणातून तसेच कलाकृतीतून आजवर आपण जो आनंद घेत आलात तो अजून वृद्धिंगत करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करत राहील. आपण जरी कधी प्रत्यक्ष भेटलो नसुत, बोललो नसुत तरी,
‘अरे विशाल गरड माझा जिगरी दोस्त आहे’ असे तुम्ही म्हणू शकता एवढी जवळीकता तुमच्या फेसबुक आणि व्हाट्स अप पोस्ट मधून अनुभवायला मिळाली. दोस्तांनो आपल्यातले हे नकळत निर्माण झालेलं प्रेम माझ्या जगण्याचे सार आहे.

खरं सांगू ज्यांना मी नावानिशी ओळखत नाही, समक्ष कधी भेटलोही नसेल अश्यांनी कधीतरी मला व्याख्यानातून ऐकलेले असते, कुणी मला फक्त सोशल मिडिया वर फॉलो करत असतात तर कुणी माझी पुस्तके वाचून मला ओळखत असतात. त्या सर्वांनी आजच्या दिवशी मला त्यांच्या स्टेटस वर ठेवलंय, कुणी फेसबुक वर तर कुणी इन्स्टाग्राम वर. ह्या प्रेमाची उतराई अशक्य असल्याने त्यांच्या ऋणात राहणेच पसंद करतो. दोस्तांनो तुमच्या प्रेमाला तोड नाही. तुम्हा सर्वांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे. कोरोनाचे संकट संपल्यावर भविष्यात जिथे कुठे मी दिसेल तुमचा भाऊ समजून मोठ्याने हाक मारा तुमचे हात हातात घ्यायला आवडतील. सरतेशेवटी विशाल गरड तर त्याचे त्याचे काम प्रामाणिकपणे करतोच आहे पण केवळ तुमच्या प्रोत्साहनामुळे आणि प्रतिसादामुळे त्याचे कर्तृत्व बहरलंय तुमच्या प्रेमात लै ताकद हाय दोस्तांनो मी नतमस्तक आहे तुमच्यापुढे. धन्यवाद !

तुमचा जिगरी दोस्त : विशाल गरड
दिनांक : १८ मे २०२०