होता दोघांचाच संसार, आता सोबतीला ‘ती’ आली
काळजी आमची कराया, पहिली मला मुलगी झाली.

एकवटली भक्ती आमची, शक्तीच्या रुपात ती आली
वसा सावित्रीचा जोपासाया, पहिली मला मुलगी झाली.

जन्मलो स्त्रीच्या पोटी, प्रेमाची भूक स्त्रीनेच भागवली
कूस आमची उद्धाराया, पहिली मला मुलगी झाली.

वडीलपण दिले तिने अन् मातृत्वाला भरती आली
पितृत्व सिद्ध कराया, पहिली मला मुलगी झाली.

कवी : विशाल गरड
दिनांक : ०५ एप्रिल २०२०

माझी पहिली मुलगी