एकट्याने मदत करण्यापेक्षा जेव्हा ती समुहाने केली जाते तेव्हा तिला मोठे स्वरूप प्राप्त होते. कोल्हापुर सांगलीतील पुरग्रस्तांना मदत पाठवण्याची ही संकल्पना मी जेव्हा आमच्या संस्थाध्यक्षांना, प्राचार्यांना आणि विद्यार्थ्यांना सांगितली तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला. अतिशय अभिमानाने सर्वांनी सढळ हाताने मदत केली. एक विस्कटलेला संसार पुन्हा नव्याने उभा राहिल एवढी रक्कम आम्ही पुरग्रस्तांना पाठवत आहोत. त्यांचे आशिर्वाद आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या यशात कामी येतीलच आणि आजची ही कृती आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी वृद्धींगत करण्यास मदत करेल. बाकी शिक्षण देणे घेणे तर चालूच राहील पण गरजवंतांना आपल्या ताटातला एक घास देण्याचे शिक्षणही तितकंच महत्वाचं असतं ते अशा उपक्रमातुन वाढीस लागतं. मदतीचा हात दिलेल्या प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थीनींचे, संस्थाध्यक्षांचे व माझ्या सहकारी प्राध्यापकांचे मनापासुन आभार.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
डाॅ.चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय, उक्कडगांव

िनांक : १२ ऑगस्ट २०१९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here