आजपर्यंत माझ्या प्रत्येक पुस्तक प्रकाशन सोहळ्यातून काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करत आलोय. सर्वसामान्यांना प्रकाशनाचा मान देत आलोय, माझ्या मेंदूत शिजलेल्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देत आलोय; त्याला हा प्रकाशन सोहळा तरी कसा अपवाद ठरेल. “व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय” या नवीन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होतोय खूपच भन्नाट, प्रेरणादायी आणि तितकाच आल्हाददायी सुद्धा. लॉकडाऊनमुळे इच्छा असतानाही तुम्हाला आमंत्रित करू शकत नाही. हो पण २५ जुलैला सकाळी झालेला हा प्रकाशनाचा सोहळा मी दृकश्राव्य माध्यमात कैद करून त्याचदिवशी संध्याकाळी तुम्हाला पाहण्यासाठी उपलब्ध करेल. माझ्या यू ट्यूब चॅनलवर किंवा फेसबुक पेजवर तुम्ही या प्रकाशनाची चित्रफीत अवश्य पाहा.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २४ जुलै २०२०