आज आपल्या लग्नाला एक वर्ष पुर्ण झालं. कलाविश्वात गुंतलेल्या माझ्यासारख्या माणसाला तू संसाराच्या राजवाड्यात बसवलंस तेव्हापासुन तुझ्या स्वाधिन झालोय. मी काय पुण्य कमवलं माहित नाही पण मला बायको कशी हवी या माझ्या स्वप्नातल्या कल्पनेपेक्षा वास्तवातली विरा कैकपटीने भारी आहे. प्रेम तर तुझ्यावर करतच आलोय पण गेल्या वर्षभराच्या संसारातल्या तुझ्या वागणूकीने प्रेमासोबत माझ्याकडून आदरही मिळवलाय. तू त्या सर्व सुखांची हकदार आहेस जे तू स्वप्नात पाहिली असतील. आत्ता कुठं एक वर्ष झालंय पण या एकावर एक शुन्य येईपर्यंत तुझ्या हरएक स्वप्नांची पुर्तता होईल असे आश्वासन नाही तर वचन देतो. त्याच एकावर जर दोन शुन्यांएवढी तुझी सोबत मिळाली तर या जगाच्या अजरामर पानांवर तुझं आणि माझं नांव कोरीन. पिढ्यान पिढ्या लक्षात राहण्यासारखं काम करिन. विशाल गरड हे नांव तुला उखाण्यात घ्यायची गरजच पडणार नाही एवढं वलय भविष्यात त्या नावाला असेल. आजवर मी एकट्याने पाहिलेली सगळी स्वप्न आता आपल्या दोघांची आहेत. ती तुझ्या साथीने पुर्ण करण्याचा प्रवास एक नवा ईतिहास रचणार आहे तेव्हा अशीच सोबत रहा जब तक है जान…

विरा’चा नवरा : विशाल गरड
दिनांक : १९ ऑगस्ट २०१९