उठता फोन, बसता फोन
चालता फोन, थांबता फोन
आयुष्याच्या प्रायोरिटीत समद्यात वरी हाय रं फोन
लिव्हायला फोन, वाचायला फोन
बघाया फोन, ऐकाया फोन
आयुष्याच्या प्रायोरिटीत समद्यात वरी हाय रं फोन
हालका फोन, भारी फोन
थ्रीजी फोन, फोरजी फोन
आयुष्याच्या प्रायोरिटीत समद्यात वरी हाय रं फोन
सुखात फोन, दुःखात फोन
हसता फोन, रडता फोन
आयुष्याच्या प्रायोरिटीत समद्यात वरी हाय रं फोन
त्याच्याकडं फोन, तिच्याकडं फोन
बंगल्यात फोन, झोपडीत फोन
आयुष्याच्या प्रायोरिटीत समद्यात वरी हाय रं फोन
सकाळी फोन, दुपारी फोन
सायंकाळी फोन आन् रात्रीबी फोन
एवढ्या समद्या व्यापामंदी घरच्यांना येळ देणार कोण ?
कवी तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १३ मार्च २०१८