वाईट विचारांची कत्तल करण्यासाठी शब्दांचे छर्रे असलेली ही विचारांची बंदूक हाती घ्यायलाच हवी.

विचारांना बंदूकीने मारणाऱ्याला शब्दांचे उत्तर शब्दांनी तर गोळीचे उत्तर गोळीनेही द्यायलाच हवे.

विकृत समाज प्रवृत्तीला सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी स्वतःलाही जगवायलाच हवे.

अक्षरांची काडतुसं घुसतील ह्रदयात पण नासलेल्या डोक्यात गोळ्या भरायलाच हव्या.

स्वतःला मारून दुसऱ्यासाठी जगता येत नाही तेव्हा अंगावर येणाऱ्याला शिंगावर घेण्याची तयारी ठेवायलाच हवी.

बंदुकीने माणूस मारून विचार मरत नाही पण मेलेले डोके पुन्हा विचार करायला शिल्लक उरत नाही हेही लक्षात ठेवायलाच हवे

म्हणुनच म्हणतो आता लेखणी आणि तोंड चालवणाऱ्यांनी बंदूका अन् तलवारीही चालवायला शिकायलाच हव्या.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २६ जानेवारी २०१९