गढूळ पाण्यात अश्रूंचा शिरकाव फार झाला,
सावर रे पावसा तुझा वार फार झाला.

जिवदायिनी पाणी यमसमान झाले,
चिखलाच्या थारोळ्यात माणसांचे देह न्हाले.

होत्या नद्या म्हणे त्या तयाचा तलाव झाला,
घरादारांसह भिंतींवर चिखलाचा कोप झाला.

मदतीच्या कार्यात इथे माणसांचे देव झाले,
कोण जाणे किती देह मृत्युच्या पाण्यात न्हाले.

कवी : विशाल गरड
दिनांक : ११ ऑगस्ट २०१९