ती वाघीनच होती स्वतःच्या लेकराला जीव पणास लावून वाचवणारी पण पुराच्या पाण्यात होडी उलटल्यानं तीचा घात झाला.

ती वाचलीच असती त्या पाण्याच्या जलाशयात हात हालवून पण हातातलं लेकरू सोडून तीला पोहता आलं नाही

नाकातोंडात पाणी शिरले, शिरातला प्राण बुडुन गेला तरी लेकरू कवेत घेतलेला हात तसाच जिवंत राहिला.

तुटला मायेचा पदर, भिजला देह पाण्यात सारा
मरतानाचे अश्रू सुद्धा ईच्छा नसताना पाण्यात विरले.

उदया विचारतील या मेलेल्या देहाला ” तू एवढी गर्दी असलेल्या होडीत का बसलीस”

तीच्या चितेतुन निघणारा आवाज सांगेल
“माझं काय नव्हतं ओ..माझं लेकरू वाचवायचं व्हतं”

अरे कुणी होडी देतं का होडी ?
माझं लेकरू वाचवायचं व्हतं…

वक्ता तथा कवी : विशाल गरड
दिनांक : ०९ ऑगस्ट २०१९