पर्वा आमच्या सरकार (बायको) सोबत रामलिंगला रपेट मारली. त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायचा मोह आवरला नाही. आता त्याला साजेसं विचार मंथनही व्हायला हवे म्हणून हा लेखप्रपंच. खरं म्हणजे या सरकारला एकदा निवडलं की पुन्हा याची कधीच निवडणूक लागत नाही. कुणाचं सरकार आयुष्यभर लोकशाही पाळतं तर कुणाचं सरकार हुकुमशहा होऊन जातं आमचं सरकार मात्र अजुनतरी लोकशाहीची सर्व मुल्य जपणारं आहे याचा आनंद आहे.

“एका यशस्वी पुरूष्यामागे एक स्त्री असते” असं म्हणतात परंतु माझ्या मते त्या दोन असतात; म्हणजे लग्नाआधीपर्यंत आई आणि लग्नानंतर बायको. आपल्या प्रत्येक यशामध्ये या दोन स्त्रीयांचा हात असतो. त्या फक्त आपल्या पाठीशी उभ्या नसतात तर बरोबर असतात. काळजी घेणे आणि लक्ष ठेवणे हा तर त्यांचा गुणधर्मच असतो. आईची माया आणि बहिणीचा जिव्हाळा एकटी बायको देऊ शकते. जसा एक एक धागा जोडून साडीचा सुंदर पदर तयार होतो तसेच लग्नानंतरही असे अनेक क्षण एकमेकात गुंफूण संसाराचा पदर तयार होत असतो. तो पदर अधिक खुलून दिसण्यासाठी धाग्यांची विण जिथल्या तिथं बसायला हवी नाहीतर उसवलेला पदर शोभा देत नाही.

संसार म्हणजे साडी विणण्यासारखंच असते. सुख दुःखाचे अगणित धागे आपण जगत राहतो ते मनाच्या सुईत ओवून जोडत राहायचे शेवटी नवरा बायकोच्या नात्याचा एक सुंदर पदर तयार होतो त्यालाच संसार असे म्हणतात. आई आयुष्याला पुरत नाही आणि बहीण माहेरी राहू शकत नाही तेव्हा या दोघींची कमतरता बायको पुर्ण करत असते. अखेरच्या श्वासापर्यंत तीची मिळणारी सोबत तीला आपलं सर्वस्व बहाल करायला भाग पाडते. ती जरी आपल्या अर्ध्या संपत्तीची मालकीन असली तरी आपल्या स्वतःची संपुर्ण मालकी मात्र तिच्याकडेच असते.

लग्नाआधी मी बहुतांशी लेखात “आईच्या मदतीला आता दोन हात आणावे म्हणतोय” अशी ईच्छा व्यक्त केली होती पण आता लग्नानंतर मात्र अष्टभुजाधारी विराई अवतरल्याची अनुभुती होतेय. पहाटे लवकर उठण्याची सवय, घरातली सर्व कामे लगबगीने करण्याची हतोटी, माझी खातरदारी, सर्व कुटुंबियांची योग्य काळजी आणि हे करता करताच मास्टर डिग्रीचा अभ्यास हे सगळं विरा लिलया पेलतेय. देवीला अष्ठभुजाधारी का म्हणतात हे बायकोचा अभ्यास केला की समजते.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ३० ऑक्टोबर २०१८

2165 COMMENTS

 1. Good day! I know this is kinda off topic however , I’d figured I’d ask.

  Would you be interested in trading links or maybe guest writing a blog post
  or vice-versa? My site addresses a lot of the same topics as yours and I believe we could
  greatly benefit from each other. If you happen to be interested feel
  free to send me an email. I look forward to hearing from you!
  Wonderful blog by the way!

 2. Great goods from you, man. I’ve understand your stuff previous to
  and you’re just extremely excellent. I actually like what you’ve acquired here, certainly like what you are saying and
  the way in which you say it. You make it entertaining and you still
  care for to keep it wise. I cant wait to read far more from you.
  This is really a tremendous site.

 3. I’ve been exploring for a little bit for any high-quality articles or weblog posts on this kind of area .
  Exploring in Yahoo I eventually stumbled upon this website.

  Reading this info So i am glad to convey that I have an incredibly just right uncanny feeling I found out exactly what
  I needed. I so much unquestionably will make sure to do not fail
  to remember this web site and give it a look regularly.

 4. Greetings from Los angeles! I’m bored to tears at work so I decided to check out your website on my iphone during lunch break.
  I love the knowledge you provide here and can’t wait to
  take a look when I get home. I’m shocked at how fast your blog loaded on my cell phone ..
  I’m not even using WIFI, just 3G .. Anyhow, excellent site!

 5. The other day, while I was at work, my sister stole my apple ipad and tested to
  see if it can survive a 40 foot drop, just so she can be a youtube sensation. My
  iPad is now broken and she has 83 views. I know this is completely off
  topic but I had to share it with someone!