रोजची व्याख्याने, रोजचे काॅलेज, रोजचे लिखान आणि रोजचेच वाचन. यातुनही मिळाला थोडासा वेळ तर मग उचलतो पेन अन् गिरवीतो कोऱ्या कागदावर त्यातुनच मग निर्माण होते असे एखादे चित्र. माझ्या मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी फावल्या वेळातही स्वतःला कलेत बुडवून घेतो म्हणूनच डोक्यातले शब्द जिथल्या तिथं उतरंडी सारखे बसवतो म्हणजे मग बोलायला उभारल्यावर ते माझ्या दिमतीला उभारतात. चित्रकला जोपासण्यामागचे हेच आहे रहस्य.