मी एक होतो, आता लाख आहे
नाहिस दिलेस तर आता लाथ आहे.
फुटले पाय माझे, चालुनी डांबरावरती
नाहिस मान्य केले तर ढेकळात अंत आहे.
छळनं तूझं आसलं मला, पिढ्यानपिढ्या आहे
केलेस माफ नाहीस तर तु नाशवंत आहे.
कवर करू सेवा मी, जगणं मातीमोल आहे
कर्ज फेडता फेडता माझा नरकात अंत आहे.
भिक नको देऊ आम्हा, मागण्याचा हक्क आहे
कबुल कर आता अन्यथा तलाख आहे.
कवी तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ११ मार्च २०१८