हे फोटो माझ्यातल्या लेखकाला बळ देणारे आहेत. पांगरीसारख्या खेडेगावात वड्या वगळीहून चालता चालता लिहिलेलं लिखान अमेरीकीत वाचलं जातंय. तिथली मराठी मंडळी आभाळाला शिवणाऱ्या गगणचुंबी ईमारतीत आपल्या गावाकडच्या चिखलात चालण्याचा आनंद घेत आहेत. सातासमुद्रापार सुद्धा फक्त वाचण्यातुन आपल्या गावरान लिखानाचा अनुभव घेत आहेत. हे शक्य झालं शार्लट मराठी मंडळामुळे.

मंडळाचे ट्रस्टी राहुल गरड यांनी ही पुस्तके मागवली होती. खुप दिवसांपासुन ते माझे फेसबुक मित्र आहेत. आम्ही एकदाही भेटलो नाहीत परंतु विचारांची नाळ जोडली गेल्याने ते फेसबुकच्या माध्यमातुन सतत संपर्कात होते. माझी पुस्तके अमेरीकेपर्यंत पोहचावी अशी त्यांची ईच्छा होती. अखेर रिंदगुड आणि मुलुखगिरी तिथे पोहचताच ती वाचतानाचे काही फोटो त्यांनी मला व्हाॅट्सअॅप केले. याबद्दल राहुलजींचे विशेष आभार !

मी आजवर परदेशवारी केली नाही परंतु पुस्तकांनी मात्र माझे विचार सातासमुद्रापार पोहचवले याचा खुप अभिमान वाटतोय. रिंदगुड आणि मुलुखगिरी ही पुस्तके शार्लट मराठी मंडळाच्या लायब्ररीत ठेवली आहेत. शार्लटमधील अनेक लोकं या पुस्तकांचा आस्वाद घेतील. माझ्यासारख्या मराठी लेखकाला मिळालेला हा प्रतिसाद भविष्यात अनेकांना प्रेरणादाई ठरावा याचसाठी हा लेखप्रपंच. बाकी शब्दांनी जग जिंकता येतं का नाही माहित नाही पण जगातल्या प्रत्येकाचे मन जिंकता येते हे नक्की.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ०४ सप्टेंबर २०१९