विरा सोबत संसार थाटून आज तीन वर्षे पूर्ण झाली. प्रथमतः लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त विराला मनःपूर्वक शुभेच्छा.

लग्नाच्या पहिल्या वाढदिनी ती ‘बायको’ होती, दुसऱ्या वाढदिनी ती ‘आई’ झाली आणि आता तिसऱ्या वाढदिनी ती माझी चांगली ‘मैत्रीण’ झालीये. मैदानावर पळण्याची शर्यत जशी एक, दोन, साडे माडे तीन म्हणले की सुरू होते तशीच संसाराची खरी शर्यत सुद्धा वरील तीन टप्प्यानंतर सुरू होते. या शर्यतीत कुणा एकाने हरणे जिंकणे संयुक्तिक नसून दोघांनी सोबत जिंकण्यातच खरे यश आहे.

अनेक सात्यिकांनीही संसाराला वेलीची उपमा देण्याचे कारणही हेच असावे असे मला वाटते. वादळ वाऱ्यात मोठं मोठी झाडं उन्मळून पडतात पण वेल मात्र तुटत नाही. संसारात अशी अनेक वादळे येत जात असतात फक्त आपण आपला संसाराचा वेल फुलवत ठेवायचा. बाकी आज आमच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता एकमेकांचे नवरा बायको म्हणून घेण्यापेक्षा कादंबरी उर्फ साऊचे आई बाबा म्हणून घेण्यात जास्त आनंद वाटतोय.

आज पहाटेपासून आपण आमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहात. इच्छा असतानाही प्रत्येकाला धन्यवाद देऊ शकत नाही म्हणून या पोस्टच्या शेवटी आम्हाला दिलेल्या आणि देणार असलेल्या शुभेच्छांबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद !

विशाल गरड
दिनांक : १९ ऑगस्ट २०२१