नुकतीच माझी शिवजयंतीनिमित्तची व्याख्यानमाला पार पडली. यादरम्यान शिवचरित्रातले नुसते ठरावीक प्रसंग सांगण्यापेक्षा शिवरायांचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण, न्यायव्यवस्थेचे धोरण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे धोरण, धर्मनिरपेक्षतेचे धोरण, महिला सबलीकरणाचे धोरण, औद्योगिक धोरण, आर्थिक सुबत्तेचे धोरण समजून सांगण्यात व्याख्यानात प्राथमिकता दिली.

शिवचरित्रातून प्रेरणा घेतलेल्या महात्मा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, भाऊराव पाटील यांच्या जीवन चरित्राला स्पर्श केल्याने माझी व्याख्याने परिपुर्ण होणार झाली. शिवरायांच्या धोरणांचा अभ्यास करून प्रबोधन करणारा एक सामान्य मावळा म्हणून हा विचारांच्या शिवजयंतीचा सप्ताह मी पार पाडला.

या संपूर्ण व्याख्यानमालेत उपस्थित राहिलेल्या प्रत्येक श्रोत्याचे मी आभार मानतो, ज्यांच्या पाठबळाशिवाय माझ्या खांद्यावर असलेली विचारांची तिफन वैचारिक शेतात उतरवणे शक्य झाले नसते त्या सर्व आयोजकांचे आणि शिवजन्मोत्सव सोहळा समित्यांच्या प्रत्येक सदस्यांचे आभार.

शिवजयंतीचा हा संपुर्ण सप्ताह दिवसभर वाचन, चिंतन, मनन, प्रवास आणि संध्याकाळी व्याख्यान अशा दिनक्रमात गेला. आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज या सत्कार्यासाठी सदैव प्रेरणा देत राहिले. तुमचे आशिर्वाद, प्रेम आणि पाठबळाच्या बळावर प्रबोधनाची मशाल अशीच तेवत ठेवली.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड

कळंबअंबा येथील व्याख्यानाची क्षणचित्रे
सोलापूर येथील व्याख्यानाची क्षणचित्रे
सरदवाडी येथील व्याख्यानाची क्षणचित्रे
चिंचपूर (ढगे) येथील व्याख्यानाची क्षणचित्रे
चिंचोली येथील व्याख्यानाची क्षणचित्रे
नालगाव येथील व्याख्यानाची क्षणचित्रे
जेवरी येथील व्याख्यानाची क्षणचित्रे

आजवर झालेल्या इतर व्याख्यानांच्या परिपूर्ण अपडेट्ससाठी ‘विशाल विजय गरड’ या फेसबुक अकाउंटला भेट देऊन त्यातील अल्बम मध्ये जाऊन आपण सर्व व्याख्यानांचे फोटोसह माहिती पाहू शकता तसेच यू ट्यूब वर जाऊन Vishal Garad या अधिकृत चॅनलला सबस्क्राईब करून व्याख्यानासह इतर कलाप्रकाराचे व्हिडीओ पाहू शकता. चांगला विचार रुजवण्यासाठी सतत आग्रही राहायला हवे म्हणूनच शेवटी हा लेखप्रपंच, धन्यवाद !