माझी पेंटींग पोहचली अमिताभ बच्चनच्या घरात. कौन बनेगा करोडपतीच्या ऑडीयन्ससाठी आमच्या बार्शीचे उद्योजक योगेशजी अग्रवाल यांची निवड झाली होती. तेव्हा त्यांनी तात्काळ मला अमिताभजींना तुमची बाॅलपेन पेंटींग गिफ्ट करण्याची ईच्छा व्यक्त केली. मी हि लगेच अमिताभजींचे चित्र पुर्ण केले. १३ सप्टेंबरला प्रसारीत झालेल्या केबीसीच्या कार्यक्रमानंतर योगेशजींनी ती पेंटींग बच्चन साहेबांना सुपुर्द केली. अमिताभजींनी ती निरखून पाहिल्यानंतर त्यांच्या घरी घेऊन जाण्यासाठी लगेच ती पर्सनल सिक्युरीटी गार्डकडे दिली.

पहिल्या फोटोत योगेशजी अमिताभजींना चित्र देताना दिसत आहेत तर दुसऱ्या फोटोत अमिताभ माझे चित्र हातात घेऊन न्याहाळताना दिसत आहेत. जेव्हा योगेशजींनी त्यांना सांगीतले कि हे चित्र फक्त बाॅलपेन ने रेखाटलेले आहे तेव्हा ते चित्र पाहिल्यानंतर ‘ईसकी बारिकीया मै घर पे जाके देखुंगा. बोहोत खूब ! अशी प्रतिक्रिया दिली’.

सदर कार्यक्रमात सुरक्षेच्या दृष्टीने ऑडीयन्सला मोबाईल, कॅमेरा वगैरे गोष्टी आत नेऊ देत नसल्याने हे फोटो सोनीच्या वेबसाईटवर आज अमिताभ बच्चन यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून अपलोड झाले. योगेशजींनी सुद्धा ते तात्काळ मला पाठवले. आपण रेखाटलेले चित्र साक्षात अमिताभ बच्चन जेव्हा एकटक पाहतात तेव्हा कलेचे सार्थक झाल्यासारखे वाटते. माझ्या नाविण्यपुर्ण कलेचे कौतुक नाविण्यपुर्ण अभिनयाच्या सम्राटाकडून होणे नक्कीच बळ देणारे आहे. हा योग घडवून आणल्याबद्दल योगेशभाईंचे मनापासुन आभार.

दिवसाला शेकडो गिफ्ट मिळणाऱ्या अमिताभजींनी माझी पेंटींग घरी घेऊन जातो असे म्हणणे त्या कलाकृतीचा सन्मान आहे. आज पांगरीच्या विशाल गरडची पेंटींग अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यात पोहचली. आजवरच्या चित्रकलेच्या कारकिर्दीला चार चाँद लावणारी हि घटना सदैव स्मरणात राहील.

वन्स अगेन थँक्स योगेशभाई थँक्स बिग बी.

लेखक तथा चित्रकार : विशाल गरड
दिनांक : ११ ऑक्टोंबर २०१९