१४०० ग्रॅम वजनाच्या मेंदूत आपण जे काही भरतो त्यावर ठरते लोक तुमच्या डोक्यावर फुले टाकणार का दगडं. नारळा एवढ्या मेंदूच्या जीवावर जग जिंकता येते म्हणूनच शरीरात त्याचे स्थान सर्वात वरती आहे. त्याची पूजा म्हणजे त्यातल्या विचारांची पूजा. माणूस वेडा का शहाणा हे सुद्धा यांच्यावरच ठरते. आपल्या शरिराच्या कोणत्याही अवयवाने अद्वितीय कार्य केले तरी सन्मान मात्र याचाच होतो आणि वाईट काम केले तर फाशीचे दावे याच्याच भोवती गुंडाळले जाते. आयुष्यात याला समृद्ध करता आले की जीवन सहज, सुंदर आणि प्रभावी होते. अन्यथा हाता पायावर जास्त विसंबून राहावे लागते. डोळ्याला दिसलेलं आणि कानाने ऐकलेले हा कधीच विसरत नाही फक्त त्याला काय दाखवायचं आणि काय ऐकवायचं हे मात्र आपल्याच हातात असतं. माझ्या डोळ्यांनी खूप खूप वाचलं म्हणूनच मला ऐकायला जमलेले माझ्या मेंदूचं असं स्वागत करतात. सोबतचा हा फोटो कराड येथील कार्यक्रमात आमच्या हनुमंताने टिपला आहे. म्हटलं सहज शेअर करण्यापेक्षा एखादा विचार चिटकवून फेसबुक वॉलवर चिटकवावा म्हणून हा लेखप्रपंच. बाकी आपल्या डोक्यावर फुलांच्या पाकळ्या पडताना आपली नजर त्या ताटातल्या निरंजनाच्या मंद जळणाऱ्या वातीवर स्थिर ठेवली की समजते आपल्या आयुष्यात आपल्यावर जळणाऱ्या आणि आपल्यासाठी जळणाऱ्या माणसांचा महत्वाचा वाटा असतो.  

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२०