काल वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासुन आभार. स्वतःच्या वाॅलवर माझ्यासारख्या व्यक्तीचा फोटो शेअर केलेल्या हर एक दोस्ताचा ईथे नामोल्लेख करावासा वाटतोय पण प्रेम करणाऱ्या दोस्तांची संख्याच ईतकी आहे की प्रत्येकाचे नाव लिहायचे म्हणले तर पाच सात पाने तरी सहजच भरून जातील. मित्रहो तुमच्या प्रत्येकाच्या वाढदिवसादिवशी मलाही तुमच्याबद्दल भरभरून लिहून शुभेच्छा द्याव्या वाटतात पण माझ्या अधीकृत तीन अकाऊंट्स वरील मिळून दररोज शेकडो मित्रांचा वाढदिवस असतो; तेव्हा तुमच्यावरील प्रेम व्यक्त करायला मी कमी पडतो. परंतु एवढ्यातुनही शक्य तेवढ्या दोस्तांना फोन करून शुभेच्छा देण्याचा माझा प्रयत्न असतोच. सततच्या व्यस्त वेळापत्रकामुळे जर तुमच्या वाढदिवसाला माझ्याकडुन शुभेच्छा मिळाल्या नसतील तर मी मनापासुन दिलगीरी व्यक्त करतो.

प्रेम कशात मोजतात मला माहित नाही. पण फेसबुक आणि व्हाॅट्स अॅपवरच्या उत्तुंग प्रेमाने हे दोन्ही अॅप मोबाईलची रॅम सहा जीबी असतानाही दिवसभरातुन दोनदा अनइन्स्टाॅल करून पुन्हा इन्स्टाॅल करावे लागले एवढ्या शुभेच्छांचा महापुर काल अनुभवायला मिळाला. काल रात्री १२ पासुन आत्तापर्यंत माझा मोबाईल अविरत खणखणत आहे. शेकडो फोन्स आणि हजारो मेसेजेसनी मोबाईलची झाक जिरवली. खरं तर हे वाढदिवस साजरे वगैरे करणे हे मुळात मला आवडत नाही परंतु आपण वर्षभर करत असलेल्या कामाची प्रशंसा या एकाच दिवशी सर्वात जास्त अनुभवता येते याचसाठी माझ्या ऐपतीप्रमाने झेपेल एवढा एखादा छोटासा सामाजिक उपक्रम राबवून मी दरवर्षी माझा वाढदिवस साजरा करतो आणि त्यातुन माझ्यावर नव्हे तर माझ्या व्यक्तिमत्वावर प्रेम करणाऱ्या दोस्तांना एक विचार देण्याचा प्रयत्न करतो.

काल दिवसभर मोबाईलच्या किपॅडवरून माझी बोटे ऐंशीच्या स्पीडने फिरत होती. शक्य तेवढ्या दोस्ताना थॅक्स चा रिप्लाय दिलाय. ज्यांना देणे शक्य झाले नाही त्यांनाही मनापासुन धन्यवाद. पुढे वर्षभर पुरेल एवढा विचारांचा दारूगोळा कालच्या उपक्रमातुन मिळाला आणि अजुन वर्षभर माझे कार्य आणखीन वेगाने करण्यासाठीचे सुपर पेट्रोल तुम्ही तुमच्या शुभेच्छांनी माझ्या व्यक्तिमत्वात भरलंय. दोस्तानो तुम्हाला अभिमान वाटेल असे कार्य करून दाखवीन. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझ्यावर प्रेम करणाऱ्या मित्रांनो तुम्हा प्रत्येकाचा मला सार्थ अभिमान आहे. दोस्तहो आपली ओळख असो नसो मी जिथेही कुठे दिसेल तिथे नक्की भेटा तुमच्या एका अलिंगणात एका रणगाड्याएवढी ताकद आहे. विचारांच्या लढाईत असे बलाढ्य रणगाडे मला सोबत हवे आहेत.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १९ मे २०१८