दि.२६ मार्च रोजी पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या वतीने देण्यात येणारा ग्रंथप्रेमी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील विभागीय साहित्य पुरस्कार; ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी मा.श्री.लक्ष्मीकांत देशमुख (भा.प्र.से) यांच्या हस्ते स्विकारला. सदर पुरस्काराचे वितरण सांगली जिल्ह्यातील चिखली येथे संपन्न झालेल्या पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात सन्मापुर्वक करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मा.श्री.रामेश्वर पवार, जेष्ठ विचारवंत प्राचार्य यशवंतराव पाटणे, राजाराम बापू सहकारी बँकेचे चेअरमन शामराव आण्णा पाटील, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. मला मिळालेला हा साहित्य पुरस्कार मी आजवर वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी झटत असलेल्या महाराष्ट्रातील तमाम ग्रंथपालांना अर्पन करत आहे. आजचा हा पुरस्कार मराठी सांस्कृतिक जगताचा नेता समजल्या जाणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संम्मेलनाच्या अध्यक्षाकडुन स्विकारल्याने साहित्य संवर्धन व वृद्धीची जबाबदारी आणखीनच वाढल्याची जाणिव ठळकपणे होत आहे. लक्ष्मीकांत देशमुख यांच्याशी झालेल्या संवादातुन आणि यशवंत पाटणे यांच्या व्याख्यानातुन खुप काही नवीन शिकायला मिळाले. पुरस्कार तर निमित्त असते या निमित्ताने थोरामोठ्याची कौतुकाची थाप मिळते आणि जिवलगांचे आशिर्वाद मिळतात जे अखंड कष्ट करण्याचे बळ देतात. कोऱ्या कागदाला मनातल्या शब्दांनी रंगवून समाजमने मजबूत करण्यासाठी विचारांच्या विहिरी उपसण्यासाठी मी सदैव कटिबद्ध.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २६ मार्च २०१८