गेल्या दोन दिवसात MHT-CET आणि NEET चा निकाल लागला. डोंगर कुशीतल्या आमच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय. आमचे संस्थापक संजीवकुमार सोनवणे सरांनी ज्या उद्देशाने हे संकुल उभा केले तो उद्देश आजचा निकाल पाहुण साध्य होताना दिसतोय. लातूरचा सोनवणे काॅलेज पॅटर्न अवलंबून लातूर आणि उक्कडगांवच्या प्राध्यापकांनी संयुक्तपणे घेतलेले अथक परिश्रम, वीकली टेस्ट सिरिज, नाइट स्टडी, क्युरी सेशन याच्या बळावर ग्रामिण भागातील अतिशय गरिब पार्श्वभुमीचे विद्यार्थी आज शासकिय वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवत आहेत. गावकुसात राबणाऱ्या शेतकऱ्यांची लेकरं नीट आणि जेईईत चमकताना पाहूण शिक्षक झाल्याचा अभिमान कैक पटीने वाढला आहे. सकाळी सहा ते रात्री बारा अशा नियोजित व्यस्त वेळापत्रकात अभ्यास करता करता अगदी साधारण विद्यार्थ्यालाही इथे डाॅक्टर इंजिनिअरची स्वप्न पडतात. ना कसला क्लास, ना कसली टिवीशन, ना कसला क्रॅश कोर्स. रोज शिकवणारे काॅलेजमधील प्राध्यापक हेच ब्रम्हदेव समजून निकालावर मोहोर उमटवलेल्या तमाम विद्यार्थ्यांचे मनापासुन अभिनंदन !

MHT-CET

१. अक्षय सुखदेव सावंत १६१ (Open)
२. कृष्णा श्रीहरी भोगील १३९ (Open)
३. कोमल बजरंग गायवल १३७ (OBC)
४. तुषार सुग्रीव कदम १३६ (SC)
५. निलोफर पाशुमियाँ शेख १३६ (Open)
६. वैष्णवी सुनिल दुधाळ १३३ (OBC)
७. दिव्या किरण पाटील १३३ (Open)
८. अशाकांत सुहास भड १३३ (Open)
९. संकेत दत्तात्रय गवळी १२९ (Open)
१०. आदित्य विजय मुंडे १२८ (NTD)
११. ऐश्वर्या संजय स्वामी १२७ (OBC)
१२. आकाश विकास आदलिंगे १२७ (OBC)

NEET

१. कृष्णा श्रीहरी भोगील ५३२ (Open)
२. विशाल बाळासाहेब सत्वधर ४९२ (OBC)
३. आकाश विकास आदलिंगे ४४५ (OBC)
४. निहाल जयप्रकाश आयरे ४३८ (OBC)
५. विशाल तानाजी मोरे ४३७ (Open)
६. विशाल विनोद नाईकवाडी ४२४ (Open)

JEE

१. तुषार सुग्रीव कदम ४२ (SC)
२. वैभव विकास खुने ११६ (Gen)
३. उत्कर्ष भाऊसाहेब राजगुरू ७५ (SC)
४. रविंद्र हौसेराव गवळी ६१ (OBC)
५. महेश दादाराव जाधव ७८ (Gen)

प्रा.विशाल गरड
डाॅ.चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय, उक्कडगाव. दिनाक : ४ जून २०१८