निर्माण झालो जिच्या उदरात मी; ती मोहिनी (आई), आईच्या उदरातुन बाहेर आल्यावर जीने पहिल्यांदा मला हातात धरले ती गयाबाई (आज्जी – आईची आई), नाव ठेवीले ‘विशाल’ माझे; ती सविता आणि संगिता (आत्या), दिले पुत्रवत प्रेम ज्यांनी त्या रोहिनी आणि हेमलता (चुलत्या), घेते काळजी माझी जिवापाड; ती वैजियंताबाई (आज्जी – वडिलांची आई), साथ दिली आयुष्यभरासाठी ती विरा (बायको), लाभल्या गुरू काॅलेज जिवनात त्या सोनाली आणि साधना (प्राध्यापिका) दिली नोकरी ज्यांनी मला त्या सुचेता (संस्थाध्यक्षा), एवढंच नाही जन्मापासुन आजवर बहिण म्हणुन आणि मैत्रिण म्हणुन लाभलेल्या त्या हरएक स्री समोर आज मी नतमस्तक होतोय.

माझ्या जन्मापासुन आजपर्यंत या सर्व आदिशक्ती पाठीशी उभ्या राहिल्या म्हणुनच मी माझी शक्ती जगाला दाखवू शकलो. आज जागतिक महिला दिनानिमित्त एवढंच सांगायचंय की; आपल्या शरिरातली प्रत्येक मांसपेशी जिच्या पोटात तयार होते तिच्यावरच त्या शक्तीचा दुरूपयोग कधी करू नका, नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेऊन आपला हरएक अवयव तीनेच बनवलाय त्यामुळे त्या अवयवांच्या ताकदीचा वापर तिच्यावरच करू नका. सरतेशेवटी जे शिवछत्रपतींना समजले, जे शंभूराजांना उमगले, जे महात्मा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि स्री शक्तीचा आदर करणाऱ्या हरएक माणसाने केले तेच तुम्हा आम्हांस कळो आणि प्रत्येकाच्या घरात पुन्हा एकदा जिजाऊ, सावित्री, अहिल्या जन्मो हिच प्रार्थना.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०८ मार्च २०१९ | महिला दिन विशेष