आज माझ्या बायकोचा म्हणजेच विराचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस. आमच्या दोघांचा वाढदिवस अठरा तारखेलाच असतो हा योगायोगच म्हणावा लागेल. बार्शी तालुक्यातल्या कासारवाडी या छोट्याशा गावात वडिल धनाजीराव मंडलिक आणि आई संगिता मंडलिक या एका सर्वसामान्य शेतकरी दांम्पत्याच्या पोटी जन्माला आलेलं एकुलतं एक कन्या रत्न. शांत, हुशार, कष्टाळू, प्रेमळ, सुंदर, शुशिल आणि उच्च शिक्षित. एका लेखकाची, वक्त्याची व कलाकाराची बायको कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे विरा होय. ज्या क्षणी मी तिला पाहिलं अगदी त्याच्या दुसऱ्याच सेकंदात मी तीला पसंद केलं. परंतु तिने मला पसंद केलं हे जास्त महत्वाचं आहे कारण बरिच मोठ मोठी स्थळं तिला मागणी घालत असताना हे फुल माझ्या पदरी पडावं हे विशेष आहे. आजवर केलेल्या काही चांगल्या कामाचे फळ मला विराच्या रूपात मिळाले असेच म्हणता येईल.

मी एकदा गमतीत विचारलं विराला “अगं, मोठ्ठा श्रीमंत नवरा मिळाला असता की तुला; मग तु मलाच का निवडलं” तेव्हा ती म्हणाली, “मला नको मोठ्ठा बंगला, इंम्पोर्टेड गाड्या, पैशाने भरलेली तिजोरी आणि घरात नोकर चाकर. समाजात तुमची बायको म्हणुन वावरताना जी प्रतिष्ठा व सन्मान मिळतो यापुढं ती सर्व सुखं लोटांगण घालतात. मी माझा नवरा त्याच्या खिशाची श्रीमंती पाहून नाही तर त्याच्या डोक्याची श्रीमंती पाहून निवडलाय. तुमच्या कर्तुत्वावर माझा विश्वास आहे.” बस्स तिच्या या वाक्यांनी मला आजन्म जिंकलय. आता इथुन पुढचा प्रत्येक श्वास तिच्या नावावर केलाय. आयुष्याची प्रत्येक पायरी तीच्यासोबत चढायची आहे. माझ्या ह्रदयाला बंद पडताना सुद्धा तिला विचारूनच थांबावं लागेल. लव्ह यू बायको.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १८ सप्टेंबर २०१८