एका प्रियकराला प्रियसीला सतत सांगावे लागत असते की माझं तुझ्यावर प्रेम आहे पण संसारात मात्र ते सतत सांगायची गरज न पडू देणे हेच खरे प्रेम आहे. अडीच अक्षराच्या या शब्दावरच सारं जग उभं आहे. आता आपले आपण ठरवायचं इथे बसून राहायचं का उभं राहायचं. तसेही नाती, वय, रंग, भाषा, प्रांत, जात, धर्म, लिंग या सगळ्यांना भेदून ह्रदयावर ताबा मिळवणारी एकमेव गोष्ट जर कोणती असेल तर ती ‘प्रेम’ आहे. निसर्गाने बहाल केलेला हा जन्मसिद्ध हक्क मर्जीने मिळवण्यासाठी कुणाच्याही एन.ओ.सी ची गरज नसते फक्त दोन ह्रदयाचा निखळ संवाद हवा.
Do Love,
Take Love,
Spread Love.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १४ फेब्रुवारी २०२१