भूक लागलीया न्हवं मंग हे डबडं हाय की पोट भराया. डोळ्यात आन् कानात भरीवल्यालं हे घास पचलं तरं खरं न्हायतर ईच्चार न करता परचार करायची डनगाळी लागायची. डोळ्याला दिसल्यालं आणि कानाला ऐकू आल्यालं समदं आश्शील आसल आसं न्हवं. पिठ तिंबुन काटवटीवर थापल्यावर तव्यावर भाजूनच भाकर पोटात जातीया; मंग ह्ये टिव्हीवरच्या बातम्याबी तिंबू तिंबू सांगत्याती आपुनबी नुसतं हाय आसं गिळण्यापरिस जरा चावून चघळून खाल्याल्याच बऱ्या. ह्यवढं दोन महिनं टेबलावरच्या आन् हातातल्या डबड्यांची सुगी हाय. डोळ्यातलं डोळ्यात आन् कानातलं कानात राहूंद्या जर त्ये ह्रदयात मुरवायचं आसलंच तर मग ते मेंदुमार्गे यिऊद्या, थेट ह्रदयाचं कप्पं नगासा उघडं ठिऊ. होश्शीयार !

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०१ एप्रिल २०१९