Home My Articles

My Articles

© साऊचा दुसरा वाढदिवस

आज साऊचा दुसरा वाढदिवस. मातृभाषेचे सॉफ्टवेअर तिच्या मेंदूत व्यवस्थित इन्स्टॉल झाल्यामुळे गप्पा मारायला घरात अजून एक हक्काचं माणूस तयार झालंय. पहिल्या वाढदिवसाला तिच्या रांगण्याचे, बसण्याचे आणि भिंतीला धरून चालण्याचे सुद्धा कौतुक वाटायचे आणि आज तिच्या दुसऱ्या वाढदिसाला तिच्या हसण्याचे, पळण्याचे, उडया मारण्याचे,...

© सायकल मार्ट

उन्हाळ्याचं दिवस व्हतं. आम्ही दवाखान्यातल्या वडाखाली खेळत व्हताव. एवढ्यात धनगरवाडीचं सुरेश मामा आमच्या घराकडं जाताना दिसलं म्हणून म्या लगीच घराकडं धुम ठुकली. चहा पाणी करून मामा घरा बाहीर पडताच त्येज्या म्हागं मीबी बाहीर आलो, लंय वाडुळ म्हागं फिरल्यावर गावाकडं जाताना सुरेश मामानं...

© बरमगावचा बालाजी

हा आहे उस्मानाबाद तालुक्यातील बरमगाव बुद्रुक या गावचा युवक बालाजी ढवळे. पर्वा त्याच्या गावच्या इतिहासातले पहिलेच व्याख्यान मी पार पाडले. गोष्ट सहा सात वर्षा पूर्वीची आहे. बालाजी हा शिक्षणनिमित्त सोलापूर जिल्हा वसतिगृहात राहत होता. तिथेच रहाणारा बालाजीचा मित्र व आत्ताच्या प्रार्थना बालग्रामचा...

© आज भेटलो रायरीला

कादंबरी १९ फेब्रुवारीपासूनच वाचकांसाठी उपलब्ध झाली आहे तरीही अजूनपर्यंत माझ्या हातात माझ्या हक्काची प्रत आली नव्हती. फेब्रुवारीमध्ये व्याख्यानामुळे व्यस्त तर मार्च मध्ये बोर्ड परिक्षेमुळे व्यस्त त्यामुळे कादंबरी आणायला जायलाही वेळ नाही मिळाला. या साहित्यरूपी लेकराला जन्म दिल्यापासून ना त्याला कवटाळले, ना कोड...

© माझं इरकलीतलं विद्यापीठ

माझ्यावर आईहून जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आज्जी होती. दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास ती मला पोरकं करून गेली. मायेचा समुद्र जणू तव्यावर पडलेल्या पाण्याच्या थेंबासारखा चर्रर्र करून आटून जावा तशी ती निघून गेलीये पुन्हा कधीच न परत येण्यासाठी....