My Articles

© ग्रेट भेट वुईथ चित्रकार शशिकांत धोत्रे

पाहताक्षणी हा फोटो साधारण वाटत असेल पण यात जेवण करणारे गृहस्थ आहेत जगविख्यात चित्रकार दस्तुरखुद्द शशिकांत धोत्रे. काल व्याख्यानानिमित्त हिंगणीला जाताना शशीदादाची भेट घ्यायची म्हणुन त्यांच्या शिरापूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. हा माणुस जगाची भ्रमंती करताना दसऱ्याची पुर्वसंध्येला निवांत भेटणे हा माझ्यासारख्या कलाप्रेमीसाठी...

© चकारी

आज काॅलेजहून येताना उक्कडगांवच्या नदीजवळ तीन-चार पोरं चकारी खेळताना दिसली. गाडी तात्काळ थांबवून प्राध्यापकाला गाडीलाच अडकवून लहानपणीचा विशल्या बनून त्यांच्यातल्याच एकाची चकारी आणि दांडा घेऊन त्यांच्यासोबत शंभर मिटरची रेस खेळलो. सोबतचा फोटो मी ज्याची चकारी घेतली होती त्यानंच टिपलाय त्याबद्दल त्यास धन्यवाद ! 'चकारी'...

© विचारांच्या समुद्रास थेंब भेटला.

आज जेष्ठ लेखक तथा प्रख्यात वक्ते उत्तम कांबळे यांची त्यांच्या नाशिक येथील 'चार्वाकाशय' या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. अतिशय व्यस्त वेळापत्रकातुन सकाळचे दोन तास कांबळे सरांनी मला दिले. विचारांच्या या समुद्रात दोन तास पोहताना अंग शब्दांनी भिजून गेलं. अक्षरशः विचार करण्याची प्रणाली बंद पडावी,...

© प्रिय विरा

तुला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ! संसारातली ही गती तुझ्याचमुळे, स्थैर्याची प्रगतीही तुझ्याचमुळे, एका दवबिंदूला समुद्र करण्याचे सामर्थ्य तुझ्याचमुळे, एका किरणाला सुर्य करण्याचे सामर्थ्य तुझ्याचमुळे. संपुर्ण जगाकडे पाहताना माझ्या हातात तुझा हात असल्याची जाणिव जग जिंकण्याचा आत्मविश्वास देते. तू शाश्वत आहेस, तू अनंत आहेस, तू शेवटपर्यंत...

© अस्तित्व – जगण्याची समृद्ध धडपड

आमच्या घराच्या अंगणात एक लाकडी टेबल आहे. गेली आठवडाभर तो पावसात भिजतोय. कशाचातरी बी त्यावर पडला असावा. आज सकाळी आंघोळ करून येताना त्या टेबलाकडे सहज लक्ष गेले तर ईतरत्र पडलेल्या साहित्यात दोन हिरवी पानं दिमाखात लहरताना दिसली. थोडं जवळ जाऊन पाहिल्यावर फक्त मुळांच्या आधारावर...

Watch This

Most popular