My Articles

© मनिषाला न्याय द्या !

किती मनिषा असतील तिच्या, अक्षरशः चुरगाळल्या लिंगपिसाटांनी. निर्भया,श्रद्धा,असिफा,प्रियांका आणि आता हाथरस (उत्तर प्रदेश) येथील मनिषावर झालेला अत्याचार पाहून आता असं वाटतं की अशा निषेधाच्या पोस्टचे टेम्प्लेट तयार करून ठेवावे. फक्त पिडीत मुलीचे नाव, गांव आणि अत्याचार करणाऱ्यांची संख्या बदलायची झाली निषेधाची पोस्ट...

© संसार एक सिनेमा

बायको म्हणजे संस्कार रुपी सिनेमातले हे एक असे पात्र आहे जिला आई, बहीण, प्रेयसी, मैत्रीण, मुलगी, वहिनी, जाऊ, नणंद आणि पत्नी असे वेगवेगळे रोल प्ले करावे लागत असतात. या सगळ्या पात्रांना जी न्याय देते तिचा संसार सुपरहिट होतो. दोस्तांनो तुमचा हा सिनेमा...

© प्रतापगड संवर्धन मोहीम

दुर्ग रक्षणाचे अविरत श्रम जणू यांच्या पाचवीलाच पुजले  आहे म्हणूनच की काय यांना श्रमिक हे नाव शोभून दिसते. माझे प्रिय मित्र श्रमिक गोजमगुंडे यांचा दुर्ग अभ्यास म्हणजे आजच्या पिढीला मिळालेला एक ऐतिहासिक ठेवा आहे. तंजावर पासून अटक पर्यंत असलेल्या शिवरायांच्या शेकडो किल्ल्यांची...

द फ्रेम

आजपर्यंत व्याख्यानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरलोय. गावोगावी जाऊन विचार पेरता पेरता प्रवासादरम्यान कितीतरी लोकेशन्स डोळ्यात कैद होत गेल्या. निसर्गाकडे आणि समाजाकडे पाहण्याची आणि पाहिलेलं मांडण्याची शक्ती माझ्यात का बरं निर्माण झाली असावी असा विचार सतत मनात यायचा पण आज 'इंगित'...

© बेड शिल्लक नाही

कुणी बेड देता का बेड, कोरोनामुळे श्वास घ्यायला अडचण येत असलेल्या रुग्णाला कुणी ऑक्सिजनचा बेड देता का बेड. होय, सद्यस्थितीला हेच सत्य आहे आणि अशी कितीही आर्त हाक मारली तरी बेड मिळेल याची अजिबात शाश्वती नाही. अक्षरशः माणसे घरीच मरायला सोडून द्यावी...