Home My Poem

My Poem

© पहिली मला मुलगी झाली

होता दोघांचाच संसार, आता सोबतीला 'ती' आलीकाळजी आमची कराया, पहिली मला मुलगी झाली. एकवटली भक्ती आमची, शक्तीच्या रुपात ती आलीवसा सावित्रीचा जोपासाया, पहिली मला मुलगी झाली. जन्मलो स्त्रीच्या पोटी, प्रेमाची भूक स्त्रीनेच भागवलीकूस आमची उद्धाराया, पहिली...

© महापूर

गढूळ पाण्यात अश्रूंचा शिरकाव फार झाला, सावर रे पावसा तुझा वार फार झाला. जिवदायिनी पाणी यमसमान झाले, चिखलाच्या थारोळ्यात माणसांचे देह न्हाले. होत्या नद्या म्हणे त्या तयाचा तलाव झाला, घरादारांसह भिंतींवर चिखलाचा कोप झाला. मदतीच्या कार्यात इथे माणसांचे देव झाले, कोण जाणे किती देह मृत्युच्या पाण्यात न्हाले. कवी : विशाल गरड दिनांक :...

© माझं लेकरू वाचवायचं व्हतं

ती वाघीनच होती स्वतःच्या लेकराला जीव पणास लावून वाचवणारी पण पुराच्या पाण्यात होडी उलटल्यानं तीचा घात झाला. ती वाचलीच असती त्या पाण्याच्या जलाशयात हात हालवून पण हातातलं लेकरू सोडून तीला पोहता आलं नाही नाकातोंडात पाणी शिरले, शिरातला प्राण बुडुन गेला तरी लेकरू कवेत घेतलेला हात तसाच...

© बंदुक

वाईट विचारांची कत्तल करण्यासाठी शब्दांचे छर्रे असलेली ही विचारांची बंदूक हाती घ्यायलाच हवी. विचारांना बंदूकीने मारणाऱ्याला शब्दांचे उत्तर शब्दांनी तर गोळीचे उत्तर गोळीनेही द्यायलाच हवे. विकृत समाज प्रवृत्तीला सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी स्वतःलाही जगवायलाच हवे. अक्षरांची काडतुसं घुसतील ह्रदयात पण नासलेल्या डोक्यात गोळ्या भरायलाच हव्या. स्वतःला मारून दुसऱ्यासाठी जगता...

ठिणगी