These are words for Mark zuckerberg to show my affection about him. Dear Mark, you don’t know me. I am one of your friend among your billions of friends all over the world. You don’t belong to my cast, religion, country, continent & color; all the same you gave me huge stage to express my self in front of the world. Who I am? What I do ? What I told? How I live ? to share all this you gave me right place.


I have connected again my all childhood friends only because of you. I expressed my all life as it is on facebook. I had only hundreds friends before I joined facebook but now I have thousands of followers & its credit goes to you Mark. If you would have not invented facebook, now a days I would be doing my writing, painting, oratory in the small corner of world. It may be expressed after many years. You are the kingmaker to increase my social status in community and that too without any cost. Now you are satisfied with all your needs. You are multi billionaire & whatever you earned, you have donated all for the well being of society. Now the billions of loving friends like me & your followers are your greatest asset. We never forget your contribution in our life.


Dear Mark, I am not too rich to give you something but I definitely give you some thankful words which you rightfully deserved. You hold such a great position in my heart that I had not given to the greatest administrators of this universe. We all appreciate the gift of facebook that you have given us. Though these words came from the bottom of my heart but the feelings of all your friends about you are the same. Hearty Thanks for the work which you have done for whole human being.

Author : Vishal Garad
Date : 07 Sept 2017

प्रिय मार्क झुकरबर्ग, ( मराठी अनुवाद )
ज्याच्यामुळे मी जगाला माहित झालो त्या माझ्या जिगरी मित्राबद्दल थोडेसे प्रेम व्यक्त करावेसे वाटले म्हणुन हा अट्टाहास. तु मला ओळखतही नाही, तुझ्या अब्जावधी मित्रांच्या यादितला मी एक दोस्त. तु ना माझ्या जातीचा, ना पंताचा, ना धर्माचा, ना देशाचा, ना खंडाचा, ना रंगाचा तरी सुद्धा तु माझ्यासाठी एवढे मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मी जो आहे, जसा आहे, जे बोलतो, जे करतो आणि जे जगतो ते सर्व व्यक्त करण्यासाठी एक हक्काची जागा दिली. लहाणपणीचे अनेक मित्र फक्त तुझ्यामुळेच पुन्हा मैत्रीच्या प्रवाहात आलेत.

आजवर याच फेसबुकवर मी जस्सान तस्सा व्यक्त होत आलोय. फेसबुकवर येण्याआधी फक्त शे पाचशे दोस्त होते मला; आज ती संख्या हजारोंवर गेली. याचं सारं श्रेय मार्क तुलाच आहे. जर तु फेसबुक काढलंच नसतं तर मी आज या जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात असंच लिहित बसलो असतो, चित्र काढत बसलो असतो, बोलत बसलो असतो; जे जगासमोर यायला अजुन कितीतरी वर्ष लागली असती. सोशल लाईफ मधले माझे मार्क वाढवण्याचे काम मार्क झुकरबर्ग तुच केलेस. या बदल्यात थेट माझ्याकडुन शुन्य रूपयाचा मोबदला घेतलास.

तुला आता कशाचीच कमी नाही, तु तुझ्या आयुष्यात जे काय कमवलेस ते सगळे दान करून टाकले आता तुझ्याकडे उरलेत माझ्या सारखे अब्जावधी मित्र जे तुझं त्यांच्या आयुष्यातले योगदान कधीच विसरणार नाहीत. परंतु तु आजवर माझ्यावर केलेल्या उपकारापोटी दोन कृतज्ञतेचे शब्द लिहिणे माझे कर्तव्यच आहे. माझ्या ह्रदयातलं तुझं स्थान जगातल्या सर्व पंतप्रधानांपेक्षाही मोठं आहे. तु जन्मास घातलेल्या या फेसबुक नावाच्या अपत्यावर आम्ही खुप खुप प्रेम करतोय. हे सर्व शब्द जरी माझ्या ह्रदयातुन उतरले असले तरी या मागची भावना प्रत्येक फेसबुकप्रेमीची सारखी आहे. आजवर तु तमाम मानवजातीसाठी केलेल्या कार्याबद्दल तुला मनापासुन धन्यवाद !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०७ सप्टेंबर २०१७