LATEST ARTICLES

A man who won not only our country but also whole the world by his thoughts. I was drawn this unique sketch of Mahatma Gandhi that reflects his impact on the world. Name : Mahatma GandhiArtist : Vishal GaradMaterial : Ball Pen on paperType : Free HandTime required : 3 hrsDate : 2 Oct...
रविवार दर आठवड्याला येतो पण आजच्या रविवारची सकाळ स्वप्नपूर्तीची होती. झोपेतुन उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतला तर पहाटेपासूनच मित्रांच्या मेसेजेसने इनबॉक्स भरून गेला होता. सर्वांचा एकच मेसेज होता "अरे विशाल, सकाळ सप्तरंगला तुझा मोठा लेख आलाय" बहुतांशी जणांनी पेपरचे फोटो काढून पाठवले होते. जेवढा आनंद त्यांना मला हे सांगताना झाला असेल तेवढाच मलाही त्यांचे ऐकून झाला. खरंतर...
सोयीनुसार सोयाबीन घेतातभाव पाडतात वेगानेसोयीनुसार तेल गाळतातमग भाव चढवतात वेगाने मातीतल्याची किंमत नाहीतिथं कारखान्यात किंमत वाढतेमाऊली रानातली इथंअश्रू पुसत पीक काढते मातीच्या सैतानांनोमतांची तरी जाण ठेवारगात आटवून शेत पोसलंयत्याचा तरी मान ठेवा कवी : विशाल गरडदिनांक : २३ सप्टेंबर २०२१

© बायको

लग्ना आधीच्या स्वप्नात तूमामाने फोडलेल्या सुपारीत तूसाखरपुड्याच्या साखरेत तूलग्नाच्या मुंडावळीत तू चुलीतल्या निखाऱ्यात तूगॅसच्या फ्लेममध्ये तूतू भाकरीत, तू भाजीततू चपातीत, तू भातात घरातल्या केरसुनीत तूतुळशीच्या पानात तूओट्यावरच्या रांगोळीत तूदेव्हाऱ्यातल्या करंडात तू प्रेम ऊतू आलं तर ह्रदयात तूभांडण झाले तर डोक्यात तूआपल्या लेकरात तूत्याच्या हसण्या रडण्यात तू
These are words for Mark zuckerberg to show my affection about him. Dear Mark, you don't know me. I am one of your friend among your billions of friends all over the world. You don't belong to my cast, religion, country, continent & color; all the same you gave me huge stage to express my self in...
एका कुटुंबात जी जबाबदारी एक बाप पार पाडत असतो तीच जबाबदारी सोनवणे सरांनी आजवर आमच्या संकल्प परिवारात पार पाडली आहे. अनुदानित संस्थांच्या तुलनेत लॉकडाऊन काळात विनाअनुदानित संस्थांना अनंत अडचणी आल्या, आर्थिक संकटे कोसळली पण त्या सगळ्या संकटांचा भार सरांनी स्वतःच्या खांद्यावर पेलला आणि आम्हाला संरक्षित केले. विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना फॅमिलीवाली फीलिंग देणारा हा माणूस...
'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाची विजेता, सुवर्ण कट्यारीची मानकरी, महाराष्ट्राची महागायिक सन्मिता धापटे-शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. घरातल्या माणसांनी जरा उशिरा अभिनंदन केले तरी चालते म्हणून उशिरा का होईना पण प्रत्यक्ष भेटून माझे जिवलग मित्र सुप्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे यांच्या स्वर सरस्वतीचे कौतुक केले. संबंध महाराष्ट्राच्या आणि जगभरातील तमाम मराठी संगीत रसिकांच्या घराघरात सन्मिताचा आवाज...
फोटोग्राफीला फक्त व्यवसायापूरते मर्यादित न ठेवता या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या युवकांना शास्त्रशुद्ध शिक्षण देऊन त्यांच्यात आमूलाग्र बदल घडवणारे. 'फोटोआर्टीओ' स्कूल ऑफ फोटोग्राफीचे संस्थापक, द ग्रेट आर्टिस्ट सचिन भोर यांची आज पुण्यात सदिच्छा भेट झाली. माझे अमेरिकास्थित प्रिय मित्र महेश भोर यांच्याकडून सचिनदादा बद्दल मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा पासूनच...
नेतेमंडळी वादग्रस्त आणि चिथावणीखोर विधाने करतात, प्रसार माध्यमे तेच ते अधोरेखित करून दाखवत राहतात. पक्षप्रेमापोटी किंवा व्यक्तिप्रेमापोटी सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ते आमने सामने टोकाचा विरोध करतात. त्यातून जो संघर्ष आणि लढाई होते त्यात सामान्य गरीब कुटुंबातील कार्यकर्तेच धारातीर्थी पडतात. अशा वेळी मग मिर्झापुर मधला हा डायलॉग आठवतो "जब कुर्बानी देणे का टाईम आये तो, कुर्बानी सिपाही की दि...
कसलं भारी वाटतं ना जेव्हा तुमचा लहानपणीचा मित्र तब्बल वीस वर्षांनी तुम्हाला भेटतो. आज असच काहीसं घडलं इयत्ता आठवी पर्यंत माझ्यासोबत शिकलेला, एका बाकावर बसलेला लंगोटीयार महेश पुरी हा घरी भेटायला आला. घरच्यांची बदली झाल्यानंतर महेश पुरी आठवीपासूनच पांगरी सोडून गेला होता. बराच वर्षाचा काळ गेल्यानंतर फेसबूकमुळे आम्ही एकमेकांना भेटलो तिथून मग चॅटिंग वगैरे चालू झाली आणि...