तिच्या अंगावरचे काळे तांबडे पट्टे आणि झुपकेदार शेपटी ही तिची विशेष ओळख. कोऱ्या कागदावर तिला उतरवताना तिच्यासोबतच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. प्रत्येक रेषेगणिस तिच्या इटुकल्या पिटुकल्या उड्या आठवल्या, मागच्या दोन पायावर उभे राहून पुढच्या दोन पायात फळाचा एखादा तुकडा धरून अधून-मधून, खाली-वारी बघत-बघत खाताना आठवली, बाकी सोबतच्या चित्रात कागद आणि पेनचा खारीचा वाटा आहे आणि कलेचा सिंहाचा बरं.

Name : Indian Chipmunk
Artist : Vishal Garad
Material : Ball Pen on paper
Time required : 4 hrs