त्याचा काय दोष पण सर्वात जास्त पिंजरा त्याच्याच नशिबात. निसर्गाने त्याला त्याच्या मैनेसोबत राहण्याचा दिलेला अधिकार नाकारणारे आम्ही कोण ?  तरीही ज्याने त्याला बंदिस्त केलं त्याच्या घरच्या सर्वांना तो नावाने हाक मारतो. घरातील लहानग्यांसोबत वेगळं नातं निर्माण करतो. येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याने घातलेला नमस्कार कौतुकास पात्र असतो. त्याला कंठ नाही तरी तो माणसासारखा बोलतो आणि दुसरीकडे माणसाला कंठ असतानाही त्याच्याकडे इतरांशी बोलायला चार प्रेमाचे शब्द नाहीत. पेरू, आंबा, द्राक्षे, हिरवी मिरची अशी आवडीची ताजी फळे खाणारा तो पिंजऱ्यात मात्र आपण देईल ते खाऊन दिवस काढतो. थोडासा रुळल्यावर आलाच पिंजऱ्याबाहेर तरी तो उडून जात नाही. खाल्ल्या मिठाला जागून पुन्हा पिंजऱ्यात जातो. आपण तर आत्ता लॉकडाऊन झालोत ओ पण विचार करा गेल्या कित्त्येक वर्षापासून तो लोकडाऊन मध्ये राहून आपले मनोरंजन करत आलाय. अत्यावश्यक सेवेसाठी आपण बाहेर तरी पडू शकतो बिचाऱ्या त्याच्या नशिबात तर एवढं पण नाही.

लेखक तथा चित्रकार : विशाल गरड

What is his fault but most of all the cage is his destiny. Who are we to deny that nature has given him the right to live with his Mainna? Yet he treats them with love in his house who is bound to him. He creates lovely relationships with young children in the house. The greetings he gives to those coming are worthy of praise. A parrot does not have a orb, but he does speak like a man, and on the other hand, even though a man has a orb with voice, he does not have four words of love to talk to. He eats what you throw in the cage, even though he has other fruits of his choice. When the cage is opened, it does not fly because He does not forget the Lord’s favor. We are in lockdown but think that for the last several years he has been entertaining himself in lockdown. We may go out for urgent service but not so much in his destiny.

Name : Indian Parrot
Artist : Vishal Garad
Material : Ball Pen on paper
Type : Free Hand
Time required : 4 hrs