ईन्सीभाऊ रात्री सपनात आल्तं थोडी मान तिरपी करून तिरप्याच नजरेनं म्हणलं “आरं ईस्ल्या येडा का खुळा लगा. एवढी वल्डक्लास कला आंगामंदी ठिऊन नुस्तच लिव्हित बसलायसा. जरा पेन घिऊन काढं की चित्रं. किती दिस झालं तुला बघतुया. तुझ्या कुंचल्याचं फटकारं न्हाईत पडलं”. म्या म्हणलं “आवं ईन्सीभाऊ, बक्कळ कला आंगात हायत्या म्या तरी कुणा कुणाला येळ दिऊ. ठिकय बाबा तूम्ही म्हणतायसा तर घेतो पेन हातात पण चित्र कुणाचं काढू ? “आरं कुणाचं म्हंजी काय काढं की माझंच. आईनस्टाईन, एडीसन, गॅलिलियो ह्यांच्यासारखं लिओनार्दो दा विन्सीला बी वळकूदेगी लोकांनी”. “काय राव ईन्सीभाऊ मजा करताव गरिबाची, आवं ईसवीसन पंधराशे तीन साली काढल्याली मोनालिसा अजूनबी जगप्रसिद्धच हाय तुमची. करोडो डाॅलर खर्चुनबी ती पेंटींग ईकत नाय घेता येणार. चित्रकार मेला तरी त्याची कला अनादीकाल जित्ती राहती हे दाखवून दिलं तुम्ही. आवं कधीकाळी तुम्हाला शिवून गेलेला वारा जरी आम्हाला आता शिवला तरी कला सार्थकी लागलं आमची”. आपल्याला ज्यचं येडं असतंय त्यजंच याड आसलेली माणसं आपल्या सपनात येत आस्त्याती, ईन्सीभाऊ आसंच सपनात येत रहा आन् मार्गदर्शन करीत रहा. देव नाही पावला तरी चालल तुम्ही पावलाव तरी जिंदगीचं हिरं व्हत्याल आमच्या. सोनं तर ऑलरेडी झालंयचं म्हणा. थॅक्स लियोनार्दो दा विन्सी.

लेखक तथा चित्रकार : विशाल गरड
दिनांक : २० जुलै २०१९