ड्रायव्हिंग करताना ओव्हरटेक हा कम्पल्सरी पार्ट आहे. आज ड्रायव्हिंग करताना समोर एक आयशर टेंम्पो चालत होता. खुप वेळ झाले ओव्हरटेक नाही करता आले. थोडे पुढे जाण्याचा प्रयत्न केला की लगेच समोरून एखादे वाहण यायचे पुन्हा गाडी लेफ्ट साईडला दाबावी लागायची. माझ्या गाडीची स्पीड पाॅवर समोरच्या आयशरपेक्षा जास्त असतानाही समोरून येणाऱ्या गाड्यांमुळे त्या गाडीला मागे टाकून पुढे निघून जाणे शक्य...
शाळेचे दिवस होते मी इयत्ता पाचवीत शिकत होतो. दोन बंधाचे दफ्तर पाठीवर अडकवून शाळेला जायचो, घरातुन निघताना खोलीतल्या आरशाजवळच्या दिवळीत टाचा उंच करून हात फिरवायचो, आईने ठेवलेल्या सुट्ट्या पैशांपैकी चार आणे, आठ आणे हाती लागायचे. चार आणे सापडले की बाॅबॅ खायच्या, आठ आणे सापडले की लिंबाखाली बसलेल्या नांदेडकर मामाची भेळ खायची आणि नशीबाने जर कधी रूपयाचा डाॅलर सापडला तर...
आमच्या गल्लीत राहणारे राजा गाढवे उर्फ पुढारी (आमच्या पेठेतले हे गाजलेले टोपणनाव आहे) आज त्यांची नात वेदिकाला घेऊन घरी आले होते. आई नोकरीत असल्याने सध्या वेदिका रायगडला शिकत आहे. उन्हाळा सुट्टीमुळे आईवडीलांसोबत मुळ गावी आली आहे. पर्वा रस्त्यावर भेटल्यावरच मला पुढारीने नातीचे कौतुक सांगितले होते. "ईशाल, पुरगी लय झकास बुल्ती आक्शी तुज्यावाणी बग, शिवाजी महाराज आन् बाबासाहेब आंबेडकराची तर...
आज पाणी फाऊंडेशनच्या वाॅटरकप मध्ये सहभाग नोंदवलेल्या आमच्या बार्शी तालुक्यातल्या कोरफळे येथे दिड तास श्रमदान केले. झारखंडच्या कृषी संचालनालयाचे प्रमुख रमेश घोलप (भा.प्र.से) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उमेद प्रतिष्ठाणच्या सहकाऱ्यांसमवेत श्रमदान करण्याचा योग आला. एक मे दिवशी व्यस्त वेळापत्रकामुळे महाश्रमदानास उपस्थित राहता आले नव्हते पण आज मात्र घोलप साहेब, तहसिलदार ॠषिकेश शेळके यांच्यासोबत श्रमदान केले. गावकऱ्यांचा उत्साह पाहूण टिकाव आणि...
रवीदादाचा न्यूड हा चित्रपट रिलीज झाल्यापासुनच बघायचा पक्का केला होता. कलाप्रिय आणि त्यात पुन्हा हाडाचा कलाकार माणुस असल्याने ही कलाकृती पाहणे माझ्यासारख्यासाठी तरी क्रमप्राप्तच होते. काल काॅलेज सुटल्यावर थेट लातूर गाठले आणि PVR थेटरात संध्याकाळचा साडे आठचा शो बघीतला. या चित्रपटासाठी संपुर्ण थेटरात फक्त सोळाजण होतोत यावरूनच अशा कलाकृती व विषय दिग्दर्शकाकडुन का जास्त प्रमाणात हाताळले जात नाहीत याची...
दोन मोठ्ठे नेते एकत्र भेटले की त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो पण दोन कार्यकर्ते सोबत फिरले कि तो 'फुटला' असं हिणवलं जातं. दोन नेत्यांनी फुगडी धरली की नव्या युगाची नांदी म्हटलं जातं पण दोन कार्यकर्त्यांनी धरली की 'मासा गळाला लागला' असं छापलं जातं. दोन मोठ्ठे नेते खुर्चीशेजारी खुर्ची लावून बसले की कार्यकर्त्यांना भारी वाटतं पण दोन कार्यकर्ते खुर्चीला खुर्ची लावून...
बार्शीच्या मल्हार सचिन वायकुळे या बालकवीने माझ्या ह्रदयांकित या काव्यसंग्रहातली 'मराठी' ही कविता येथील स्मार्ट अकॅडमिने आयोजित केलेल्या एका शिबीरात सादर केली आहे. नुसती कविता सादर करून तो थांबला नाही तर ती कुणी लिहिली व कुठुन वाचली हे देखील मल्हारने सांगीतले. त्याच्या वडीलांनी कौतुकाने पाठवलेला व्हिडीओ मी पाहत होतो. आजच्या काॅपी पेस्टच्या जमान्यात लेखकाचे किंवा कवीचे नांव खोडून साहित्य...
काल प्रवासात असताना कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व माझी विद्यार्थीनी कु.सई टोणगे हिचे वडील श्री.सतिश टोणगे यांचा फोन आला होता की "सर उद्या आमच्या सईचा वाढदिवस आहे तेव्हा भेटायला येऊ का? मी म्हटले हो या मी आहे उद्या काॅलेजवर. सतिश टोणगे हे कळंब तालुक्यात बप्पा नावाने प्रसिद्ध आहेत. विषय कोणताही असो बप्पांची लेखणी सदैव तळपत असते. चौथ्या स्तंभाची...
उस्मानाबाद जिल्हयातील उमरगा तालुक्यात नाईचाकूर म्हणून गांव आहे. आज आमचे सहकारी प्राध्यापक मुजम्मिल शेख यांच्या लग्नाच्या निमित्ताने प्रा.विक्रम पवार यांच्या नाईचाकूर गावला माझ्या सहकारी प्राध्यापकांसह भेट देण्याचा योग आला. नवनव्या गोष्टींचे मला नेहमीच कुतुहल असल्याने या गावचे नांव देखील नाईचाकूर का पडले ? असा प्रश्न मला पडला तेव्हा गावकऱ्यांकडुन याची मोठी अख्याईका समजली. इथे एका कुत्र्याचे मंदिर बांधले आहे....
When my thoughts become congruent with ball pen ink then they command to nib of the pen to roll on blank paper. After some time, my mind gets expressed on the white paper in the form of art. Its an example of that.